घरदेश-विदेशकेजरीवालांच्या कार्यक्रमात गडकरींना करावा लागला हस्तक्षेप

केजरीवालांच्या कार्यक्रमात गडकरींना करावा लागला हस्तक्षेप

Subscribe

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यक्रमात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न लोकांकडून करण्यात आला होता. मात्र त्याचवेळी मंचावर उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हस्तक्षेप केला.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिर्ची पावडर हल्ला, थोबाडीत मारणे किंवा शिवीगाळ करणेहे हल्ले आतापर्यंत झाले आहे. मात्र आता केजरीवालांवर एक वेगळ्याच पद्धतीने हल्ला झाला आहे. हा हल्ला एका भाषणादरम्यान त्यांच्यावर करण्यात आला आहे. यामुळे अस्वस्थ होऊन मुख्यमंत्री काही  वेळ आपल्या भाषणातील मुद्दे विसले होते. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी धुरा सांभाळली आहे. एका सरकारी कार्यक्रमा दरम्यान ही घटना घडली. या कार्यक्रमात यमुना सफाईच्या मुद्यावर ते बोलत असताना काही लोकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता.

खोकलून भाषण थांबवण्याचा प्रयत्न 

केजरीवाल यांचे भाषण थांबवण्याच्या उद्देशाने काही लोक येथे आली होती. केजरीवाल यांच्या भाषणामध्ये काही लोकांनी त्यांच्याच पद्धतीने खोकलण्यास सुरुवात केली. भाषणादरम्यान खोकलल्यामुळे मुख्यमंत्री अस्वस्थ झाले. यानंतर आपल्या भाषणाचे मुद्दे ते विसरले. त्यांनी लोकांना गप्प बसण्याचे आवाहन केले. मात्र तरीही या लोकांनी आपले खोकलने सुरु ठेवले. दरम्यान गडकरींचे या गोष्टीकडे लक्ष गेले असता त्यांनी लोकांना शांत रहाण्यास सांगितले. आणि हा सराकरी कार्यक्रम असल्यामुळे तुम्ही बोला असे केजरीवालांना म्हटले. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्र्यांबरोबरच हर्षवर्धनही उपस्थित होते.

- Advertisement -

खोकला बनला ओळख

निवडणुकींमध्ये जिंकल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे स्वेटर आणि कानटोपी घालून दिसून येत होते. त्यांना प्रश्न विचारला असता खोकला येत होता. अनेकदा खोकलून त्यांना अनेक प्रश्नांना देखील टाळले आहे. याचेच प्रत्योत्तर म्हणून लोकांनीही त्यांच्या भाषणादरम्यान खोकलून दाखवले आहे. या कार्यक्रमात गंगा राष्ट्रीय योजना आणि दिल्ली जल बोर्डचा यमुना स्वच्छते बाबत कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -