घरCORONA UPDATEभिकारी असणाऱ्या राजूने १०० कुटुंबांना वाटले रेशन आणि ३ हजार मास्क!

भिकारी असणाऱ्या राजूने १०० कुटुंबांना वाटले रेशन आणि ३ हजार मास्क!

Subscribe

याशिवाय राजू गरीब मुलांची शाळेची फी भरतो, त्याने आतापर्यंत २२ गरीब मुलींची लग्न करून दिली आहेत.

देशात बरेच लोक आहेत जे भीक मागून आपला उदरनिर्वाह करतात. सध्या या लॉकडाऊनच्या काळात या लोकांचे हाल सुरू आहेत. कारण लॉकडाऊनमुळे सगळेच व्यवहार बंद आहेत. संपूर्ण देश थांबला आहे. पण पंजाबमधील पठाणकोट येथील एक भिकारी सध्या अनेकांसाठी देवदूत ठरला आहे.  भीक मागून जगणार्‍या दिव्यांग राजूने देशासमोर एक वेगळं उदाहरण ठेवलं आहे. यामुळे राजू लॉकडाऊननंतरही लोकांच्या लक्षात रहाणार आहे. कारण राजूने आतापर्यंत १०० गरीब कुटुंबांना एक महिन्याचे रेशन आणि ३ हाजर मास्क पुरवले आहेत.

राजू ट्रायसायकल घेऊन फिरतो आणि दिवसभर भिक मागतो. भिक मागून मिळवलेल्या पैशातून त्याने लोकांना मदत केली आहे. या आधी राजूने भीक मागून अनेक गरीब मुलींशी लग्न करून दिली होती. राजू म्हणतो की दिवसभरात जे काही पैसे मिळतात,  ते तो आवश्यकतेनुसार खर्च करतो, स उरलेला पैसा साठवून ठेवतो आणि गरजू लोकांना मदत करतो.

- Advertisement -

गावच्या पुलाची त्याने केली बांधणी

पठाणकोटच्या धनगु रोडवरील रस्त्याकडे जाणारा पूल तुटला होता. ज्यामुळे लोकांना त्रास होत होता. लोकांनी प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रारी केल्या. पण राजूने त्याच्या भीक मागून मिळणाऱ्या पैशातून पुल दुरस्त केला. त्यावेळी राजूची चर्चा संपूर्ण पंजाबमध्ये झाली.

राजूला एका गोष्टीची खंत आहे ती म्हणजे त्याच्या घरच्या लोकांनी त्याला दूर केलं. त्यामुळे राजू म्हणतो मी नेहमी चांगल्या लोकांना मदत करतो. काय माहिती कदाचीत हेच लोकं मी मेल्यावर मला खादां द्यायला उपयोगी पडतील. नाहीतर भिकाऱ्यांना शेवटचा खांदा द्यायलाही कोणी येत नाही.

- Advertisement -

याशिवाय राजू गरीब मुलांची शाळेची फी भरतो, त्याने आतापर्यंत २२ गरीब मुलींची लग्न करून दिली आहेत. तो भंडारा भरवतो, उन्हाळ्यात लोकांसाठी पाण्याची व्यवस्था करतो. कोरोना विषाणूमुळे, जेथे सरकारी यंत्रणा पूर्णपणे अयशस्वी झाली आहे, त्यावेळी  राजू भिकारी सगळ्यांच्या उपयोगी पडतोय.


हे ही वाचा – राष्ट्राध्यक्षांबरोबर सुरू असलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये तो झाला ‘न्यूड’ आणि…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -