घरताज्या घडामोडीभारत बायोटेकची कोरोना लस 'कोव्हॅक्सिन'च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात

भारत बायोटेकची कोरोना लस ‘कोव्हॅक्सिन’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात

Subscribe

देशात नव्या कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली तरी कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. त्यामुळे सध्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर लस विकसित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भारताच्या बायोटेकची कोरोना लस कोव्हॅक्सिनची तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली आहे. भारत बायोटेक कंपनीने कोरोनाच्या लसीसाठी आयसीएमआरसोबत भागीदारी केली आहे. सोमवारपासून या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली आहे. याबाबतची माहिती भारत बायोटेकने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.

- Advertisement -

या लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी काही दिवसांपूर्वी यशस्वीरित्या पूर्ण झाली होती. भारत बायोटेक जगातील एकमेव लस कंपनी आहे, ज्यांच्याकडे जैव सुरक्षा स्तर-३ (BSL3) उत्पादन सुविधा आहे. गेल्या महिन्यांत कंपनीने म्हटले होते की, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे आणि २६ हजारांच्या भागीदारांवर तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात करत आहोत. ऑक्टोबर महिन्यात कंपनीने डीजीसीआयकडे लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी मागितली होती. कंपनी अजून एका कोरोना लसीवर काम करत आहे. ही लसी नाकावाटे दिल्या जाणाऱ्या ड्रॉप स्वरुपात असेल. पुढच्या वर्षापर्यंत ही लस होईल.

दरम्यान नुकतेच अमेरिकेतील दुसरी आणि महत्त्वाची लस उत्पादक कंपनी मॉडर्नाने आपली लस ९४.५ टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे. लेट-स्टेज क्लिनिकलच्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार कंपनीने हा दावा केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मोठा दिलासा! ‘मॉडर्ना’ कंपनीची लस ९४.५% यशस्वी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -