Thursday, August 6, 2020
Mumbai
27 C
घर ताज्या घडामोडी जबरदस्त! BSNL ने ग्राहकांना दिला 5GB हायस्पीड डेटा फ्री!

जबरदस्त! BSNL ने ग्राहकांना दिला 5GB हायस्पीड डेटा फ्री!

ग्राहकांना हा फ्री डेटा कंपनीच्या वायफाय हॉटस्पॉटवरून मिळणार आहे.

Mumbai
bsnl revised old tariff plan customer get 5 gb date in 35rs lan
BSNL च्या ३५ रुपयांच्या स्पेशल टॅरिफ पॅकमध्ये ५ जीबी डेटा

BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. BSNL नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवीन ऑफर्स आणत असतात. आता नवीन ऑफर अंतर्गत कंपनी आपल्या युजर्संना ५ जीबी हायस्पीड डेटा एकदम फ्रीमध्ये देत आहे. मात्र ग्राहकांना हा फ्री डेटा कंपनीच्या वायफाय हॉटस्पॉटवरून मिळणार आहे.

बीएसएनएलने ५ जीबी डेटा कसा मिळवायचा या संबंधीची पद्धत आपल्या ट्विटर अकाऊंटवर युजर्संना सांगितली आहे. या सुविधेसाठी कंपनीने एक यूट्यूब व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात सर्व स्टेप्स सांगितल्या आहेत. या ऑफरचा लाभ कंपनीच्या लँडलाईन युजर्संना मिळू शकणार आहे.

असा मिळवा ५ जीबी फ्री डेटा

१. आपल्या स्मार्टफोनमध्ये वायफाय ओपन करा आणि BSNL Wi-Fi SSID सिलेक्ट करा

२. ओपन झालेल्या पेजवर या ठिकाणी तीन पर्याय Public Wifi, BSNL users आणि Landline मिळतील.

३. Landline च्या ऑप्शनवर क्लिक करणे.

४. आपला बीएसएनएल लँडलाईन नंबर STD कोडसोबत नोंदवा. त्यानंतर Get PIN वर टॅप करा.

५. आता तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक पिन येईल.

६. तो टाकून Login करा. आता तुम्हाला फ्रीमध्ये ५ जीबी डेटा मिळू शकतो.

लँडलाईन युजर्ससाठी  ऑफऱ

५ जीबी डेडा ही ऑफर केवळ लँडलाईन युजर्ससाठी आहे. ज्यांच्याकडे बीएसएनएलची हॉटस्पॉटची सुविधा उपलब्ध असेल. ५ जीबी फ्री डेटा संपल्यानंतर युजर्संना एक मेसेज येईल. ज्यात सांगितले जाईल की, तुमचा फ्री डेटा संपला आहे. जर तुम्हाला आणखी डेटा हवा असल्यास तुम्ही डेटा प्लान खरेदी करू शकता. कंपनीने ५९९ रुपयांचा नवीन प्रीपेड व्हाउचर आणला आहे. नवीन प्लानची वैधता ९० दिवसांची आहे. तसेच सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग, रोज ५ जीबी स्पीड डेटा आणि १०० फ्री एसएमएस देण्यात आले आहे.


हे ही वाचा – धोकादायक! मोबाईलमधील ‘हे’ App करतायत हेरगिरी, त्वरीत काढून टाका!