घरदेश-विदेशBudget 2019 : महिला आणि विद्यार्थ्यांसाठी अर्थसंकल्पात 'या' तरतूदी

Budget 2019 : महिला आणि विद्यार्थ्यांसाठी अर्थसंकल्पात ‘या’ तरतूदी

Subscribe

केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात महिला आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष गोष्टींच्या तरतूदी करण्यात आल्या आहेत.

मोदी सरकारच्या दुसऱ्या सत्रातील पहिला अर्थसंकल्प सादर झाला आहे. या अर्थसंकल्पात महिला, विद्यार्थी आणि तरुणांसाठी वेगवेगळ्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पात महिलांसाठी मोदी सरकारने विशेष अशी तरतूद केली आहे. सरकारने जनधन खातेधारक महिलांना ५ हजार रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधा लागू केली आहे. यासोबतच महिलांसाठी १ लाख रुपये मुद्रा लोनची सुविधा लागू केली असल्याची घोषणा सीतारमण यांनी केली.

विद्यार्थ्यांसाठी ‘या’ योजना लागू करणार

निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात विद्यार्थी आणि तरुणांसाठी विविध तरतूदी करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी सीतारमण यांनी ४०० कोटी रुपयांची घोषणा केली. यामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, नॅशनल रिसर्च फाउंडेशन आणि ज्ञान योजना यांचा समावेश आहे. देशातील टॉप-२०० शिक्षण संस्थांमध्ये देशातील शिक्षण संस्थाचे नाव व्हावे, असे निर्मला सीतारमण म्हणाल्या आहेत.

- Advertisement -
  • भारत सरकार विद्यार्थ्यांसाठी शनल एज्युकेशन पॉलिसी, नॅशनल रिसर्च फाउंडेशन आणि ज्ञान योजना सुरु करणार आहे.
  • देशात उच्च शिक्षण निर्माण करण्याचा प्रयत्न भारत सरकार करणार आहे.
  • विदेशातील विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी स्टडी इन इंडिया ही योजना लागू करणार.
  • स्टूडंट लोन किंवा एज्युकेशन लोनसाठी सरकार बॅंकिंग व्यवस्थेला आणखी सोपी बनवणार आहे.

हेही वाचा – Budget 2019 : भारत सरकार गरिबांसाठी कोट्यवधी घरे बांधणार

हेही वाचा – Market Live : ४० हजारांची उचल घेतल्यानंतर सेसेंक्स पुन्हा १०० अकांनी पडला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -