घरदेश-विदेशप. बंगालमध्ये भाजपच्या रथयात्रेला परवानगी नाही - SC

प. बंगालमध्ये भाजपच्या रथयात्रेला परवानगी नाही – SC

Subscribe

पश्चिम बंगाल उच्च न्यायालयानं देखील भाजपच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या रथ यात्रेला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

पश्चिम बंगाल उच्च न्यायालयानं देखील भाजपच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या रथ यात्रेला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. उद्या राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते भाजपच्या रथयात्रेची सुरूवात होणार होती. पण, आता उच्च न्यायालयानं देखील रथ यात्रेला परवानगी देता येणार नाही असं म्हटलं आहे. यापूर्वी सकाळी देखील पश्चिम बंगाल सरकारनं देखील रथ यात्रेला परवानगी देता येणार नाही अशी भूमिका कोर्टात मांडली होती. त्यानंतर भाजपनं देखील कोर्टात धाव घेत रथ यात्रेला परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. त्यानंतर न्यायालयानं निर्णय देताना उद्याच्या भाजपच्या रथ यात्रेला परवानगी देता येणार नाही असं म्हटलं आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, ही रथ यात्रा अत्यंत शांतपणे काढली जाईल. त्यामध्ये कोणतीही अनुचित प्रकार घडणार नाही. त्याची जबाबदारी आम्ही घेतो असं भाजपनं न्यायालयामध्ये सांगितलं आहे. दरम्यान, उद्या सकाळी १०.३० मिनिटं भाजप सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी न्यायालय काय निर्णय देणार हे पाहावं लागणार आहे.

४० दिवस चालणारी ही रथयात्रा २९४ विधानसभा क्षेत्रातून जाणार होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ४ ठिकाणी सभा होणार होत्या. पण, राज्य सरकरानं रथ यात्रेला परवानगी नाकारल्यानंतर उच्च न्यायालयानं देखील रथ यात्रेला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे उद्या सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार हे पाहावं लागणार आहे. पण, पश्चिम बंगाल उच्च न्यायालयाचा हा निर्णय भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

वाचा – भाजपच्या रॅलीला ममता बॅनर्जींची आडकाठी!!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -