केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या आई चंद्रकांता गोयल यांचं शनिवारी निधन झालं. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. चंद्रकांता गोयल या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या होत्या. शिवाय, माटुंगा मतदारसंघातून त्या विधानसभेवर देखील गेल्या होत्या.
अपने स्नेह, और प्रेम से मुझे हमेशा राह दिखाने वाली मेरी पूज्य माता जी का आज सुबह स्वर्गवास हो गया।
उन्होंने अपना पूरा जीवन सेवा करते हुए बिताया, और हमें भी सेवाभाव से जीवन बिताने को प्रेरित किया। ईश्वर उन्हें अपने श्री चरणों मे स्थान दें। ॐ शांतिः pic.twitter.com/mwlIks6TBJ
— Piyush Goyal (@PiyushGoyal) June 6, 2020
पीयूष गोयल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. “आपल्या स्नेह व प्रेमाने मला नेहमी मार्ग दाखवणारी माझी आदरणीय आई आज सकाळी स्वर्गवासी झाली. त्यांनी आपलं संपूर्ण जीवन सेवा करत व्यतित केलं व आम्हाला देखील सेवाभावाने जीवन व्यतित करण्यासाठी प्रेरित केलं. ईश्वर त्यांच्या आत्म्यास आपल्या चरणाशी स्थान देवो, ॐ शांती..” असं पीयूष गोयल यांनी ट्विट केलं आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे, पूनम महाजन यांनीही ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Pained to hear of the sad demise of Smt. Chandrakanta Goyal ji. In Mummy, BJP had strong voice in the assembly and a loving leader. The entire Goyal family has been a pillar of strength for us in Maharashtra.
My condolances to @PiyushGoyal ji & the entire family.Om Shanti !
— Poonam Mahajan (@poonam_mahajan) June 6, 2020
श्रद्धांजली !!
चंद्रकांता गोयल आमच्या सर्वांच्या लाडक्या मम्मी, मुंडे साहेबांवर त्यांचं खूप प्रेम होतं आणि आमचे- त्यांचे अनेक वर्षे संबंध होते. अटलजी बिहारी वाजपेयीजी आले तर नेहमी त्यांच्या घरी राहायचे आणि आम्ही नेहमी तिकडे त्यांना भेटायला जायचो.
(१/२)— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) June 6, 2020