बॉयफ्रेंडच्या घरी राहायला गेलेल्या गर्लफ्रेंडच्या घराची झाली अशी हालत!

Paris
corona virus lockdown france 3 months kitchen grow on walls alien like plants potato woman twitter
बॉयफ्रेंडच्या घरी राहायला गेलेल्या गर्लफ्रेंडच्या घराची झाली अशी हालत!

जगभरात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आला. यामुळे अनेक लोक शहरातले घर सोडून जुन्या घरात राहायला गेले. अशा प्रकारे फ्रान्स मधील एक महिलेने तिचा फ्लॅट लॉकडाऊनमध्ये बंद करून निघून गेली. जेव्हा ती ३ महिन्यानंतर परत आली तेव्हा स्वयंपाकघरातील अवस्था पाहून ती आश्चर्य चकीत झाली. तिच्या फ्लॅटमधील स्वयंपाकघरात गुलाबी रंगाचे विचित्र असे काहीतरी उगवले होते. जे ‘एलियन ट्री’ सारखे दिसत होते.

स्वयंपाक घराची अशी अवस्था पाहून ती घाबरली. त्यानंतर तिने पुन्हा ते नीट पाहिले आणि तेव्हा तिला कळाले की, हे एलियन ट्री नसून बटाट्याचे अंकुर पसरले होते आहे.

या महिलेचे नाव डोना परी असे असून ती २२ वर्षांची आहे. तिने स्वयंपाक घरात उगवलेल्या बटाट्याचे अंकुराचे फोटो ट्विटवर शेअर केले आहेत. दरम्यान डोनाने मार्चमध्ये लॉकडाऊन अगोदर सुपरमार्केटमधून बटाटे आणून घरात ठेवले होते. त्यानंतर लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर डोनाने आपल्या बॉयफ्रेंडसोबत सेल्फ आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.

डोनाने सांगितले की, तिने फ्लॅटमध्ये महत्वाचे सामान खरेदी करून ठेवून गेली होती. त्यावेळेस तिने घरात बटाटे ठेवले होते. जेव्हा ती ३ महिन्यांनी घरात परतली तेव्हा तिच्या स्वयंपाक घराची अवस्था पूर्णपणे बदलली होती. तिने कात्रीने सर्व बटाट्याचे उगवलेले अंकुर कापले. डोनाने स्वयंपाक घराचा हा फोटो शेअर करत लिहिले की, ‘जर तुम्ही महिन्याभरासाठी घर बंद करून बाहेर जात असला तर घरात बटाटे सोडून जाऊ नका.’