घरदेश-विदेशकरोनाचा २ वर्षे असणार मुक्काम

करोनाचा २ वर्षे असणार मुक्काम

Subscribe

अमेरिकेच्या मेरीलँड विद्यापीठाच्या हॉस्पिटलमधील साथरोग विभागाचे प्रमुख आणि करोनावर उपचार करणारे डॉक्टर फहीम युनूस यांनी जगाला इशारा दिला की, जगभरातील नागरिकांनी सत्य स्वीकारले पाहिजे, पुढील २ वर्षे करोना जाणार नाही. त्यामुळे खोट्या आशेपेक्षा हे सत्य भल्याचे आहे. मी सहानूभूतीपूर्वक करोनासंबंधी खरी माहिती शेअर करत आहे. कारण करोनाशी लढण्यासाठी आपण एकत्र होऊन योजना बनवू शकू. तयारी करू आणि एकमेकांची मदत करु.

फहीम युनूस यांनी सांगितले की, माझा उद्देश केवळ माणसांची मदत करणे एवढाच आहे. लाईक, रिट्विट यामध्ये अजिबात रस नाही. करोना संपल्यावर तुम्हाला मी इथे सक्रीय असल्याचे दिसणार नाही. करोना व्हायरस पुढील दोन वर्षे जाणारा नाही. करोना महामारी दोन वर्षांहून अधिक काळ राहणार आहे. याचे कारणही त्यांनी दिले आहे. करोना व्हायरसचा पहिला रुग्ण सापडून सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. करोनाची लस शोधण्यासाठी अद्याप १ वर्ष अवकाश असल्याचे फहीम यांनी सांगितले. म्हणजेच पुढील वर्षभर करोना राहणारच आहे. जरी लस सापडली तरीही तिचे उत्पादन आणि जगभरात वाटप होण्यासाठी कमीतकमी एक वर्ष लागणार आहे.

- Advertisement -

हर्ड इम्युनिटी खूप दूर आहे. महामारीने वेग पकडला आहे. यामुळे लस आल्यानंतर साधारण वर्षभराने करोनाचा कहर कमी करून दिलासा मिळण्यासाठी दोन वर्षे जाणार आहेत. या हिशोबानेच योजना बनवायला हवी, असे फहीम युनूस यांनी सांगितले. यानंतर फहीम यांनी अमेरिकेतील करोना रुग्णांच्या संख्यावरही मत मांडले आहे. अमेरिकेमध्ये २५ लाखांहून अधिक करोनाचे रुग्ण सापडले आहेत. अमेरिकेची प्रमुख आरोग्य संस्था सीडीसीनुसार अमेरिकेमध्ये खरी संख्या ही १० पटींनी अधिक असू शकते. पाकिस्तानने अमेरिकेपेक्षा १५ पटींनी (प्रति १० लाख लोक) कमी चाचण्या घेतल्या आहेत. मात्र, तेथे २ लाख रुग्ण सापडले आहेत. म्हणजे कल्पना करा पाकिस्तानात करोना रुग्णांची खरी संख्या किती असू शकते, असेही फहीम म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -