घरCORONA UPDATEदेशात कोरोनाचा कहर! बाधित रुग्णांचा आकडा ८ लाखांच्या पुढे!

देशात कोरोनाचा कहर! बाधित रुग्णांचा आकडा ८ लाखांच्या पुढे!

Subscribe

भारतात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. शुक्रवारी संध्याकाळी देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ८ लाख पार झाला आहे. जगात अमेरिका, ब्राझील, भारत या देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसत आहे. आज केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्याने मागील विक्रम मोडला आहे. आज देशात २६ हजार ५०६ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित आकडा ७ लाख ९३ हजार ८०२ झाला होता. पण संध्यापर्यंत हा आकडा ८ लाखांच्या पुढे गेला आहे.

देशात कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित असलेल्या महाराष्ट्रात बाधित आकडा २ लाख ३८ हजार ४६१वर पोहोचला आहे. तसेच तामिळनाडूमधला आकडा १ लाख ३० हजार २६१ झाला आहे. तर दिल्लीतला १ लाख ९ हजार १४०वर पोहोचला आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे.

- Advertisement -

दरम्यान वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगात आतापर्यंत १ कोटी २५ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ५ लाख ५९ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे ७ लाख २९ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – Corona: मुंबईत २४ तासांत आढळले १,३५४ नवे रुग्ण, एकूण आकडा ९० हजार पार!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -