घरदेश-विदेशमेजर गोगोईंच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई होणार

मेजर गोगोईंच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई होणार

Subscribe

मेजर लितुल गोगोई यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जर याप्रकरणात मेजर गोगोई दोषी आढलल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी सांगितले.

श्रीनगरमध्ये एका हॉटेलबाहेर तरुणीसोबत अटक करण्यात आलेल्या मेजर लितुल गोगोई यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. कर्तव्यावर असताना मेजर गोगोई त्यांची नेमणूक करण्यात आलेल्या हद्दीच्या बाहेर होते. तसंच गोगोई यांना देण्यात आलेल्या निर्देशांच्याविरोधात जाऊन त्यांनी स्थानिक नागरिकांशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केल्याचाही त्यांचावर आरोप आहे. यासर्व प्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले असून त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.

- Advertisement -

तरुणीसोबत गोगोई यांना अटक

२३ मे रोजी भारतीय लष्करामध्ये मेजर पदावर असलेले मेजर लितुल गोगोई यांना श्रीनगर येथील हॉटेल ग्रँड ममताच्या बाहेर बडगामच्या एका १८ वर्षाच्या तरुणीसोबत अटक करण्यात आले. हे प्रकरण समोर आल्यानंतर लष्कराकडून गोगोई यांची न्यायालयिन चौकशी करण्याचे आदेश दिले. मेजर गोगोई तरुणीसोबत हॉटेलमध्ये जाण्याच्या प्रयत्न करत होते. मात्र हॉटेलच्या मॅनेजरसोबत त्यांचा वाद झाला. त्यामुळे हॉटेल मॅनेजरने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी या तरुणीसोबत मेजर गोगोई यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. श्रीनगरच्या आयजींनी या प्रकरणाचा तपास श्रीनगरचे एसपी सज्जाद शाह यांना दिले.

- Advertisement -

दोषी आढळल्यास कारवाई होणार

मेजर गोगोई याप्रकरणात दोषी आढळले तर त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल, असे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी सांगितले. भारतीय लष्कराची कोणताही अधिकारी जर एकाद्या प्रकरणात दोषी आढळला तर त्याच्याविरोधात कडक शिक्षा केली जाते. “मेजर गोगोई यांनी काही चूक केली असले. तर मी आश्वासन देतो की, त्यांना लकवरात लवकर शिक्षा केली जाईल.” असे रावत यांनी सांगितले. गोगोई यांना शिक्षा देखील अशी होईल जी उदाहरण प्रस्तापित करेल. जम्मू-काश्मीर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. मेजर गोगोई, त्यांचा गाडी चालक आणि बडगावच्या तरुणीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दगडफेक करणाऱ्या तरुणाला गाडीला बांधून फिरवले होते

याआधी देखील मेजर लितुल गोगोई चर्चेत आहेत. मागच्या वर्षी काश्मीरमध्ये जवानांवर दगडफेक करणाऱ्या तरुणाला गाडीच्या बोनटला बांधून मेजर गोगोई यांनी फिरवले होते. याप्रकरणाने देखील मोठा वाद उपस्थित झाला होता. तेव्हापासून मेजर गोगोगई चर्चत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -