घरताज्या घडामोडीट्र्म्प यांची भारत भेट- यमुनेचे गटार लपवण्यासाठी गंगेचा वापर

ट्र्म्प यांची भारत भेट- यमुनेचे गटार लपवण्यासाठी गंगेचा वापर

Subscribe

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २३ फेब्रुवारीस भारत भेटीवर येत आहेत. आपल्या या चार दिवसीय भेटीत ते विविध पर्यटनस्थळांना भेट देणार आहेत. यामुळे उत्तर प्रदेश सरकारचे धाबे दणाणले असून येथील पर्यंटनस्थळांवरील अस्वच्छता लपवण्यासाठी योगी सरकारचा आटापिटा सुरू आहे. ट्र्म्प सर्वप्रथम आग्रा येथील ताजमहालला भेट देणार आहेत. यावेळी ते साहजिकच ताजमहालच्या मागे वाहणाऱ्या यमुनेचे दर्शन घेणार असल्याने यमुनेत वाहणारा कचऱ्याचा ढिग आणि त्यातून येणारी दुर्गंर्धी रोखण्यासाठी योगी सरकारने गंगेचे पाणी यमुनेत सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतातील महत्वाच्या नद्यांमध्ये यमुनेचाही समावेश आहे. यामुळे ताजमहालबरोबरच त्याच्या मागे वाहणाऱ्या यमुनेचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी येथे दररोज शेकडो पर्यटक येत असतात. पण गेल्या काही वर्षांपासून यमुना प्रदूषित झाली असून सांडपाण्यामुळे नदीच्या पाणी दुर्गंर्धीयुक्त झाले आहे. ही बाब ट्र्म्प यांच्या लक्षात आल्यास नाचक्की होईल यामुळे उत्तर प्रदेश सरकारच्या सिंचन विभागाने यमुनेत बुलंदशहरातील गंगेच्या पात्रातून ५०० क्युसेक पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून यमुनेचे पाणी वाहते राहील व नदी स्वच्छ दिसण्याबरोबरच त्यातील दुर्गंधीही जाईल. बुलंदशहर येथून सोडले जाणारे गंगेचे पाणी २१ तारखेपर्यंत यमुनेला जाऊन मिळेल. त्यामुळे पाण्यातील ऑक्सीजनचे प्रमाण वाढेल असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

मात्र पर्यावरण तज्ज्ञांनी मात्र या उपायांचा काहीही उपयोग होणार नसल्याचे सांगितले आहे. या उपायामुळे एक ते दोनच दिवस यमुनेचे पाणी प्रवाहीत असेल नंतर मात्र नदीची अवस्था जैसे थे वैसे असेल असा दावा त्यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -