घरदेश-विदेशआश्वासनांना म्हणी नका बनवू - अरविंद केजरीवाल

आश्वासनांना म्हणी नका बनवू – अरविंद केजरीवाल

Subscribe

दिल्लीतील मेट्रो ४ प्रकल्पाला आप सरकारने मंजूरी दिली तर १ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी केली होती. मेट्रो प्रकल्पाला मंजूरी मिळाल्यानंतर या घोषणांना म्हणी बनवू नका असे ट्विट आप पक्षाकडून करण्यात आले आहे.

दिल्लीच्या मेट्रो ४ प्रकल्पाला आज केबिनेटमध्ये हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. या निर्णयानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री यांनी पुन्हा भाजपवर निशाना साधला आहे. भाजपानी दिलेल्या आश्वासनाला म्हणी बनू देऊ नका असे ट्विटर आपच्या वतीने करण्यात आले आहे. मेट्रो ४ प्रकल्पाअंतर्गत १०३ किमी चा वाहतूक मार्ग तयार केला जाणार आहे. ज्यामध्ये एकूण ७९ स्थानक असणार आहेत. याव्यतिरिक्त सध्याच्या मेट्रोमध्ये अधिक डबे जोडण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आली. या प्रकल्पावर ४६ हजार ८४५ कोटी रुपये खर्च होणार आहेत.

का केले असे ट्विट

दिल्लीतील मेट्रो प्रकल्पाला मंजूरी दिल्यास आप सरकारला एक लाखाचा निधी दान करण्याची घोषणा दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी यांनी केली होती. “आप का दान, रस्ते का निर्माण” या योजनेअंतर्गत वाहतूक सेवा निर्माण करण्याचे काम सुरु आहे. या योजनेला १ लाख ११ हजार १०० रुपयांचा निधी देण्याची ग्वाही तिवारी यांनी दिली होती. मेट्रो प्रकल्प पास झाल्यानंतर आता त्यांच्या आश्वासनाला पूर्ण करा असे ट्विट आप पक्षाकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

दिल्ली सरकारला येईल इतका खर्च

मेट्रो प्रकल्पासाठी एकूण ४६ हजार ८४५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये दिल्ली सरकारला ९ हजार ७०७ कोटी रुपये देणे आहेत. इतर निधी केंद्र सरकारकडून निरीक्षण करुन दिले जाणार आहे. हा प्रकल्प जानेवारी २०१९ पासून सुरु केली जाणार आहे. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत हा प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -