घरदेश-विदेशश्रीलंकेत आठ साखळी बॉम्बस्फोट

श्रीलंकेत आठ साखळी बॉम्बस्फोट

Subscribe

२०७ ठार, ४५० जखमी

रविवारी साखळी बॉम्बस्फोटांनी भारताचा शेजारील देश श्रीलंका हादरला. श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये सकाळी एका पाठोपाठ एक असे सहा बॉम्बस्फोट नंतर पाच तासांनंतर दोन असे आठ बॉम्बस्फोट झाले. यातील तीन बॉम्बस्फोट हे चर्चमध्ये तर तीन बॉम्बस्फोट हॉटेलमध्ये झाले. पाच तासांनंतर झालेले दोन बॉम्बस्फोट हे कोलंबोच्या रस्त्यावर झाले. ईस्टर संडेला झालेल्या या बॉम्बस्फोटात सुमारे २०७ जणांचा मृत्यू झाला असून त्यात ३५ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. स्फोटात 4५० हून अधिकजण जखमी झाले आहेत. या प्रकरणी सात संशयितांना अटक करण्यात आली आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेत संचारबंदी लागू करण्यात आली. तसेच या बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर भारतात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेतील कोलंबो साखळी बॉम्बस्फोटांनी हादरले आहे. कोलंबोमधील शँग्रिला आणि सिंनामोन ग्रँड आणि किंग्सबरी हॉटेलमध्ये तसेच कोलंबो बंदराजवळील सेंट अँथनी चर्च, कोच्चिकेडे चर्च, उत्तलम जवळील सॅबेस्टिअन चर्च या तीन चर्चमध्ये स्फोट झाले. रविवारी (21 एप्रिल) स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.45 वाजण्याचा सुमारास पहिला बॉम्ब स्फोट सेंट अँथनी चर्चमध्ये झाला. या बॉम्बस्फोटानंतर पाच तासांनी म्हणजे दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कोलंबियाच्या प्राणीसंग्रहालयाबाहेर आणि उत्तर कोलंबोतील ओरुगावाट्टा या उपनगरात झाला. या दोन बॉम्बस्फोटात दोनजण ठार झाले.

- Advertisement -

भारताचे मदतीचे आश्वासन
बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांना तातडीने स्थानिक इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकन सरकारने कोलंबोमध्ये त्वरीत संचारबंदी लागू केली. बॉम्बस्फोटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना आणि पंतप्रधान रनील विक्रमसिंघे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. तसेच आवश्यक
ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.

स्वराज यांच्याकडून परिस्थितीचा आढावाभारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कोलंबोतील बॉम्बस्फोटांच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ’कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात आहोत. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे’ असं ट्वीट सुषमा स्वराज यांनी केलं आहे.

- Advertisement -

हेल्पलाईन नंबर जारी
कोलंबोतील परिस्थितीवर आम्ही नजर ठेवून असल्याची माहिती देणारे ट्वीट भारतीय दूतावासाने देखील केले आहे. या ट्वीटमध्ये भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे. कोलंबो आणि बट्टीकालोआमध्ये स्फोट झाल्याची माहिती आम्हाला मिळाली असून आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे ट्वीटमध्ये म्हटले आहे. मदत किंवा इतर माहितीसाठी भारतीय नागरिकांना संपर्क करता यावा साठी क्रमांकही देण्यात आले आहेत. +94777903082,+94112422788,+94112422789, +94112422789 हे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत तर श्रीलंकेतील संपर्क क्रमांकाव्यतिरिक्त+94777902082 +94772234176 या क्रमांकावरही भारतीय संपर्क करू शकतात.

कोलंबोत तीन भारतीयांचा मृत्यू
श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये तीन भारतीयांचा मृत्यू झाला आहे. लोकेशीनी, नारायण चंद्रशेखर आणि रमेश अशी या तिघा भारतीयांची नावं असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे.

नॅशनल थोवित जमात संघटनेवर संशय
पोलिसांनी सात संशयितांना अटक केली असल्याचे श्रीलंकेच्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितले. हे सर्व संशयित नॅशनल थोविथ जमात या संघटनेचे आहेत. नॅशनल थोविथ जमात ही संघटना श्रीलंकेतील कट्टर मुस्लिम संघटना मानली जाते. या संघटनेने बुद्धमूर्ती तोडल्या होत्या.

तो शांतपणे जेवणाच्या रांगेत उभा होता
कोलंबोतील शँग्रिला हॉटेलमध्ये सकाळी ९ वाजता बॉम्बस्फोट झाला. येथील प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आत्मघाती दहशतवादी हातात प्लेट घेऊन हॉटेलच्या जेवणाच्या रांगेत उभा होता. रांग पुढे सरकत होती. तो रांगेच्या मध्यभागी आल्यानंतर त्याने आपल्या पाठिवर लावलेल्या बॉम्बचा ट्रीगर दाबला आणि मोठा स्फोट झाला. त्यानंतर किंचाळ्या आणि विव्हळण्याचे आवाज आले. हॉटेलमध्ये रक्तमांसाचा सडा पडला होता, त्या दहशतवाद्याच्या अंगाचे तुकडे-तुकडे झाले होते, असे हॉटेलच्या मॅनेजरने सांगितले.

दहा दिवसांपूर्वीच दिला होता इशारा
श्रीलंकेची राजधानी कोलंबोतील चर्चमध्ये आणि भारतीय दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट होण्याची शक्यता कोलंबोच्या पोलीस प्रमुखांनी दहा दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. त्यानुसार, भारतीय दूतावासाबाहेर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र चर्चेमध्ये तसा बंदोबस्त तैनात करणे शक्य झाले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -