नोट्रे डेम कैथेड्रल चर्च बांधायला लागली १०० वर्ष

१०० वर्ष या इमारतीचे बांधकाम सुरु होते. फ्रेंच गॉथिक आर्किटेक्टने बांधलेली ही इमारत ६९ मीटर उंचीची आहे. या इमारतीच्या शिखरावर पोहचण्यासाठी ३८७ पायऱ्या चढाव्या लागतात.

Mumbai
fire breaks out at notre dame cathedral
नोट्रे डम कैथेड्रल या ऐतिहासिक इमारतीला आग

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये असणाऱ्या नोट्रे डेम कैथेड्रल या ऐतिहासिक इमारतीला सोमवारी आग लागली. या आगीमध्ये कैथेड्रल इमारतीचे शिखर पूर्णपणे जळाले आहे. जवळपास ८५० वर्ष जुनी असलेल्या या इमारतीचे मूळ बांधकाम सुरक्षित राहिले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल ९ तासानंतर आगीवर नियंत्रण मिळण्यात यश आले आहे. कैथेड्रलचे दोन बोल टॉवर सुरक्षित आहेत. दरम्यान, या पुरातन इमारतीच्या आतमधील कलाकुसरीचे किती नुकसान झाले हे अद्याप समोर आले नाही.

पुननिर्माणासाठी मदतनिधी गोळा करणार

असे सांगितले जात आहे की, कैथेड्रल इमारतीच्या दगडांना तडे पडल्यानंतर त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. दुरुस्तीच्या कामावेळीच इमारतीला आग लागल्याची घटना घडली असावी असा अंदाज तपास अधिकारी लावत आहेत. पॅरिसच्या प्रशासकिय कार्यालयाने याप्रकरणाच्या तपासासाठी समितीची स्थापना केली आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमैनुएल मैक्रों यांनी आपल्या सर्व बैठका रद्द केल्या आहेत. त्यांनी फ्रान्सची एैतिहासिक वास्तू असलेल्या इमारतीला आग लागल्याच्या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी असे देखील सांगितले की, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी या इमारतीची आग लवकर विझवून तिचा बचाव केला आहे. मैक्रों यांनी कैथेड्रल इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निधी गोळा करणार असल्याचे सांगितले आहे.

काही मिनिटात पडले इमारतीचे छत

कैथेड्रल या ऐतिहासिक इमारतीला आग स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६.३० वाजता लागली होती. अवघ्या काही मिनिटातच इमारतीचे छत जळून खाक झाले आणि ते कोसळले. या आगीमध्ये इमारतीचे लाकडापासून बनवलेले शिखर कोसळले. ही आग ऐवढी भीषण होती की संपूर्ण पॅरिस शहरामध्ये कुठूनही दिसत होती. तब्बल ५०० अग्निशमन दलाच्या गाड्यांमार्फत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले गेले. कैथेड्रल इमारतीवर हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला गेला. जवळपास नऊ तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

नेपोलियन बोनापार्ट याचा राज्याभिषेक झाला होता

नोट्रे डेम या इमारतीची बांधकाम ११६० साली करण्यात आले होते. हे बांधकाम १२६० पर्यंत करण्यात आले. १०० वर्ष या इमारतीचे बांधकाम सुरु होते. फ्रेंच गॉथिक आर्किटेक्टने बांधलेली ही इमारत ६९ मीटर उंचीची आहे. या इमारतीच्या शिखरावर पोहचण्यासाठी ३८७ पायऱ्या चढाव्या लागतात. या इमारतीमध्ये नेपोलियन बोनापार्ट याचा राज्याभिषेक सोहळा झाला होता. १२ व्या शतकामध्ये नोट्रे डम कैथेड्रल या चर्चचे बांधकाम करण्यात आले होते. वर्ल्ड हेरिटेजमध्ये या चर्चचा समावेश आहे. हे चर्च पर्यटकांसोबतच ईसाई समुदायाचे आस्था केंद्र होते. दरवर्षी या इमारतीला बघण्यासाठी १.२ कोटी पर्यटक येतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here