घरदेश-विदेशहिमाचलप्रदेशमध्ये पावसाचा हाहाकार; १८ जणांचा मृत्यू

हिमाचलप्रदेशमध्ये पावसाचा हाहाकार; १८ जणांचा मृत्यू

Subscribe

केरळ, जम्मू-काश्मीरनंतर आता हिमाचलप्रदेशमध्ये पावसाने हाहाकार केला आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे पूरपरिस्थिती आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. या पावसामुळे हिमाचलच्या ८ जिल्ह्यांमध्ये हायअलर्ट देण्यात आला आहे.

केरळनंतर हिमाचलप्रदेशमध्ये देखील पावसाने कहर केला आहे. गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आतपर्यंत भाजप नेत्यासह १८ जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे हिमाचलप्रदेशमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर अनेक ठिकाणी भूस्थलनाच्या घटना घडल्या आहेत. हिमाचलप्रदेशच्या ८ जिल्ह्यामध्ये हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे.

- Advertisement -

२४ तासामध्ये अनेक भागात हायअलर्ट

हिमाचलप्रदेशमध्ये गेल्या दोन दिवसापासून पावसाने धुमाकुळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे शिमलासोबत हिमाचलच्या अनेक जिल्ह्यामध्ये पूर आला आहे. हवामान खात्याने पुढच्या २४ तासामध्ये हिमाचलच्या अनेक भागांमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे हिमाचल सरकारने जनेतेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या भागामध्ये भारतीय जवान, एनडीआरएफची टीम बचाव कार्यामध्ये लागली आहे.

पावसामुळे १८ जणांचा मृत्यू

हिमाचलप्रदेशमध्ये पूराचा सर्वात जास्त फटका असर कुल्ल, सोलन, मंडी, हमीरपुर आणि कांगडा जिल्ह्याला बसला आहे. सोलनमध्ये पाऊस आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मंडीमध्ये ४, हमीरपूर आणि कांगडा जिल्ह्यात २ जणांचा मृत्यू झाला आहे. त्या व्यतिरिक्त बिलासपूर आणि ऊना जिल्ह्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. पूर परिस्थितीमुळे हिमाचलप्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना तातडीने मदतकार्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

सरकारकडून विशेष हेल्पलाईन नंबर जारी

पावसामुळे हिमाचलप्रदेशच्या अनेक गावांचा संपर्क तूटला आहे. त्याव्यतिरिक्त राज्यातील ९०० पेक्षा जास्त रस्ते पावसामुळे बंद झाले आहेत. राज्यमहामार्गावर भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे धर्माशाला-शिमला आणि चंदीगड-मनाली राज्यमार्ग बंद करण्यात आला आहे. पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने सरकारकडून विशेष हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -