घरअर्थजगतसोने खरेदीची सुवर्णसंधी; आजपासून मोदी सरकार विकणार स्वस्तात सोनं!

सोने खरेदीची सुवर्णसंधी; आजपासून मोदी सरकार विकणार स्वस्तात सोनं!

Subscribe

केंद्रातील मोदी सरकार पुन्हा एकदा तुम्हाला स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी देत आहे. सार्वभौम गोल्ड बाँड योजना (Soverign Gold Bond) २०२०-२१ ची सातवी योजना आज १२ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. (Sovereign Gold Bond Scheme 2020-21-Series VII) बाजारातील सोन्याच्या किंमतीपेक्षा कमी दरात खरेदी करता येणार आहे. १६ ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला सोनं खरेदी करता येणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सोन्याच्या सबस्क्रिप्शनची किंमत प्रति ग्रॅम ५,०५१ रुपये निश्चित केली आहे. त्यामुळे ऑनलाईन गोल्ड बाँड घेणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ५० रुपये प्रति ग्रॅम सूट देण्यात आली आहे. ऑनलाईन सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी याचा भाव ५,००१ रुपये प्रति ग्रॅम असणार आहे, अशी माहिती RBI ने एक निवेदन जारी करत सांगितलं आहे. गोल्ड बाँडची मॅच्यूअरिटी कालावधी ८ वर्षांची आहे. खरंतर, गुंतवणुकीच्या ५ वर्षानंतर यामधून बाहेर पडता येऊ शकतं. मॅच्यूअरिटीवर मिळणाऱ्या सोन्याची किंमत सध्याच्या किंमतीवर आधारित आहे. जर तुम्हीही गुंतवणूक करण्यासाठी इच्छित असाल तर तुम्हाला या गोष्टी माहिती असणं महत्त्वाचं आहे.

- Advertisement -

१. ऑगस्ट महिन्यात मोठ्या पातळीवर सोन्याचे भाव घसरल्यानंतर या योजनेत तोटा होण्याचा धोका आहे. १० ग्रॅम सोन्याच्या भावावर वायदा बाजारात किमान ५६,२०० रुपये आहेत.

२. RBI ने गोल्ड बाँडच्या अंतर्गत सोन्याचा भाव इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) द्वारे निश्चित केला आहे. यात शुद्ध सोन्यासाठी ९९९ रुपये आहेत.

- Advertisement -

३. गोल्ड बाँडला भारतीय रिझर्व्ह बँक जारी करते. याला केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात येतं.

४. गोल्ड बाँड योजनेला नोव्हेंबर २०१५ मध्ये सुरू करण्यात आलं होतं. देशातील फिजिकल सोन्याची मागणी कमी करण्यासाठी आणि लोक सोन्याद्वारे देशांतर्गत व आर्थिक बचतीची बचत करण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे.

५. या योजनेंतर्गत किमान १ ग्रॅम सोन्याची गुंतवणूक केली जाऊ शकते.

६. गोल्ड बाँड योजनेचा लाभ घेण्यासाठी स्मॉल फायनान्स बँक किंवा पेमेंट बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस आणि एनएसई आणि बीएसई मार्फत गुंतवणूक करता येते.

७. नॉन-फिजिकल सोन्यात गोल्ड बाँडची गुंतवणूक करणं एक चांगला पर्याय आहे. जर गोल्ड बाँडमधील गुंतवणूकदार मॅच्यूअरिटीपर्यंत राहिला तर याचे बरेच फायदे मिळतात.

८. गोल्ड बाँडवर वर्षाला २.५० टक्के व्याजदर मिळतं.

९. गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे याला ठेवण्यासाठी जागा शोधण्याची गरज नाही आणि यावर कोणताही जीएसटी द्यावा लागत नाही.

१०. जर गोल्ड बाँडच्या मॅच्यूअरिटीवर भांडवल नफा झाला तर चांगली सूट मिळते. सोन्याच्या बाँडवरील हा एक मोठा फायदा आहे.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -