घरदेश-विदेशसोन्याच्या भावात सलग तिसऱ्या दिवशी घसरण

सोन्याच्या भावात सलग तिसऱ्या दिवशी घसरण

Subscribe

सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे.

सोन्याच्या भावात सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली. बुधवारी सोने प्रति दहा ग्रॅममागे ३९६ रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे आज सोन्याचा भाव ४० हजार ८७१ रुपयांपर्यंत खाली आला आहे. याशिवाय चांदीच्या दरात देखील आज मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली. कमॉडीटी बाजारात मागील दोन सत्रात सोने १ हजार २०० रुपयांनी स्वस्त झाले असून सोन्याचा भाव ४० हजार १८८ रुपयांवर आहे.

- Advertisement -

‘एचडीएफसी सिक्युरिटीज’च्या माहितीनुसार, दिल्ली सराफा बाजारामध्ये सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅममागे ३९६ रुपयांनी खाली आले आहे. त्यामुळे सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमला ४१ हजार २६७ रुपये होता. तर सोन्यासह चांदीच्या दरातही प्रतिकिलोमागे १७९ रुपयांनी घसरण झाली असून चांदीचा भाव ४६ हजार ८८१ रुपये झाला आहे.

…यामुळे सोन्यात झाली घसरण

शेअर बाजारामध्ये सेन्सेक्स १३० अंकांनी वर गेला, तर निफ्टीनेही १२ हजारांचा टप्पा पार केला. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्याच्या खरेदीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे याचा फटका सोन्याला बसला असून सलग तिसऱ्या दिवशीही सोन्याचे भाव घसरले. दरम्यान, जागतिक कमॉडिटी बाजारात सोने दरात घसरण झाल्याने त्याचे पडसाद आज स्थानिक सराफा बाजारावर उमटले असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. दरम्यान, आज चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयात ८ पैशांची वाढ झाली. रुपया ७१.१७ वर व्यवहार करत होता.
परिणामी गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा शेअरमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य दिल्याचे शेअर विश्लेषकांचे म्हणणे आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती सावरल्याने तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारातही सोनेदरात घट आल्याने देशांतर्गत सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘७ दिवसांत काय ते ठरवा’, निर्भयाच्या दोषींना अखेर कोर्टाचाच शेवटचा अल्टिमेटम!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -