घरदेश-विदेशखुशखबर! आता वेटिंगलिस्टमधील प्रवासी ही करु शकणार प्रवास

खुशखबर! आता वेटिंगलिस्टमधील प्रवासी ही करु शकणार प्रवास

Subscribe

RCTC अर्थात इंडियन रेल्वे केटरिंग आणि ट्युरिझम कॉरपोरेशनकडून ऑनलाईन तिकीट बुकींग केले जाते. अॅडव्हान्स तिकीट बुकींगची सुविधा देत १२० दिवसांपूर्वी ही तिकीट बुकींग करता येते. ज्यांना 'Confirmed' आणि 'RAC'( Reservation against cancellation) असे तिकीट मिळते. त्यांनाच ट्रेनमध्ये चढण्याची मुभा असते.

रेल्वेचे तिकीट काढल्यानंतर वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या प्रवाशांचे वेटिंग अगदी पहिल्या १० मध्ये जरी आले तरी त्या प्रवाशांना ट्रेनमध्ये चढू दिले जात नव्हते. असे ऑनलाईन तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांनी प्रवास केल्यास त्यांच्याकडून विनातिकीट प्रवास केल्याप्रकरणी दंड ही वसूल केला जात असे. रेल्वेच्या या नियमामुळे अनेकांना नाहक त्रास होत होता अखेर आता आयआरसीटीसीने हे नियम बदलले आहेत. आता वेटिंगलिस्टमधील प्रवाशांना रेल्वेतून प्रवास करता येणार आहे.

या प्रवाशांना बसत होता फटका?

IRCTC अर्थात इंडियन रेल्वे केटरिंग आणि ट्युरिझम कॉरपोरेशनकडून ऑनलाईन तिकीट बुकींग केले जाते. अॅडव्हान्स तिकीट बुकींगची सुविधा देत १२० दिवसांपूर्वी ही तिकीट बुकींग करता येते. ज्यांना ‘Confirmed’ आणि ‘RAC'( Reservation against cancellation) असे तिकीट मिळते. त्यांनाच ट्रेनमध्ये चढण्याची मुभा असते. WL असे असल्यास मात्र तिकीट जो पर्यंत सिटनंबर सह मिळत नाही तो पर्यंत ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जात नाही. तर काऊंटर किंवा विंडोवरुन काढलेल्या वेटिंगलिस्टचे प्रवासी ट्रेनमधून प्रवास करु शकत होते. पण ऑनलाईन तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना ही परवानगी नव्हती. त्यांना त्यांच्या तिकीटाचे पैसे ऑनलाईन परत दिले जायचे. त्यामुळे शेवटपर्यंत प्रवाशाला तिकीट कन्फर्म होण्याची वाट पहावी लागे.

- Advertisement -

आता काय केला बदल?

आता ऑनलाईन वेटिंग तिकीट काढलेल्या प्रवाशांना ट्रेनमध्ये चढता येणार आहे. IRCTCकडून हे बदल करण्यात आले आहेत. शिवाय चार तिकीटांपैकी २ तिकीटं कन्फर्म असल्यास चारही जण ट्रेनमध्ये चढू शकतात. आणि दोन जागांवर चार जण बसू शकतात.कारण वेटिंगमधील प्रवाशांचे नाव देखील या याद्यांमध्ये असणार आहे. त्यामुळे आता वेटिंग तिकीट असल्यास चिंता करण्याचे कारण नाही. कारण रेल्वेने प्रवाशांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -