घरदेश-विदेशपाकिस्तानचा झेंडा हाती घेत, 'तो' चक्क घाणीत बसला

पाकिस्तानचा झेंडा हाती घेत, ‘तो’ चक्क घाणीत बसला

Subscribe

कराची शहरातील पायाभूत सोयी-सुविधांचा मुद्दा तडीस नेण्यासाठी तो चक्क पाकिस्तानचा झेंडा हातात घेऊन घाणीत उतरत आहे.

पाकिस्तानातील कराची शहरात कचऱ्याचा प्रश्न, नालेसफाई आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात नाही, याचा विरोध करण्यासाठी शहरातील आम आदमी पक्षाचा पुढारी चक्का कचराकुंडी आणि नाल्याच्या घाण पाण्यात पाकिस्तानचा झेंडा हाताता घेऊन आंदोलन करत आहे. आम आदमी पक्षाच्या या पुढाऱ्याचे नाव अयाज अहमत मोतीवाला असून शहरात घाणीचे साम्राज्य पसरल्याबद्दल सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी त्याने हे कृत्य केले असल्याचे समजते. “मी इथे घाणीत हातात झेंडा घेऊन बसलोय. पण मी झेंड्याला पडू देणार नाही, मात्र जनता या झेंड्याचा दांडा तुमच्या डोक्यात घालेल”, असे आव्हान मोतीवालाने सत्ताधाऱ्यांना दिले आहे. कराची पालिकेचे निवडणूक जवळ आली असून लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी मोतीवाला अशा हटके प्रकारचे आंदोलन करत आहेत.

#موتیوالا_نے_گٹر_کا_پانی_پی_کے_حُکمرانوں_کو#دعوت_دےدی_کہ_کوئی_ایک_عوام_کے_مُفاد_میں#کیا_گیا_کام_بتاؤں #میرے_ساتھ_بیٹھ_کے_گٹر_کے#پانی_میں_جیسے_عوام_پیتے_ہیں_گندا_پانی_پیئو#نلکا #ایسا_انشاءاللّہ #پانی_سے_بھرا#Tareekh_Raqam#Teen_Azad_Halqo_Par_Ek_Hi #Intakhabi#Nishan #Nalqa (نلکا)#Nalkay_Ko_Vote_Do ? #Nalqay_Me_Pani_Lo ? #Thappa_Lagao_Sirf_Nalqay_Ko ?#PS_110#PS_111#NA_243

Posted by Ayaz Memon Motiwala on Saturday, 30 June 2018

- Advertisement -

पाकिस्तानच्या आम आदमी पक्षाचे चिन्ह नळाच्या तोटीचे आहे. त्यामुळे पाणी हा विषय त्यांच्या अजेंड्यावर असल्याचे स्पष्ट होते. मोतीवाला यांनी आपल्या फेसबुक पेजवर असे अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत. कराचीमध्ये घाण पाण्याचा पुरवठा पिण्यासाठी केला जात आहे. याविरोधात मोतीवाला फिल्मी स्टाईलमध्ये आंदोलन करतात. कराचीमध्ये मोतीवाला यांच्या निवडणूक कॅम्पेनची चांगलीच चर्चा रंगली आहे. नागरी प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मोतीलाल सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत आहेत.

याआधीही मोतीलाल यांचे अनेक फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. कराचीतील कचराकुंडीत बसून फोटो पोज देणे असो किंवा नाल्यात उतरूण फेसबुक लाईव्ह असो, मोतीलाल बिनधास्तपणे हे स्टंट करत असतात. कचराकुंडीत बसून चक्क जेवण करण्याचेही आंदोलन त्यांनी केले होते. ज्याला पाकिस्तानी मीडिया आणि सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धि मिळाली होती. मात्र नाल्याच्या घाण पाण्यात पाकिस्तानचा झेंडा घेऊन बसल्यामुळे आता त्यांना लोकांचाही पाठिंबा मिळत आहे.

- Advertisement -
AAP Ayaz Ahmad Motiwala
कचराकुंडीत बसून मोतीवाला यांचे आंदोलन

आपल्या फेसबुक अकाऊंटवर केलेल्या लाईव्ह व्हिडिओमध्ये त्यांनी कराची पालिकेच्या सत्ताधारी आणि विरोधकांवर आसूड ओढले आहेत. शहराच्या पायाभूत सोयी सुविधांवर कोणीच लक्ष देत नसून माझा पक्ष शेवटची आशा असल्याचे आवाहन ते जनतेला करत आहेत. मोतीवाला यांच्या या हटके आंदोलनाला प्रस्थापित पुढारी पब्लिसिटि स्टंट म्हणून हिनवत आहेत. तरीही मोतीलाला यांची प्रसिद्धि काही कमी होताना दिसत नाही.

AAP Ayaz Ahamad Motiwala
नाल्यात उतरूण फेसबुक लाईव्ह करताना मोतीवाला
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -