घरट्रेंडिंगसोशल मीडियाचा वापर केला नाही तर ?, वाचा काय होईल

सोशल मीडियाचा वापर केला नाही तर ?, वाचा काय होईल

Subscribe

सोशल मीडिया हे आपलं विश्व होऊन गेले आहे. यापासून लांब राहण्याचे ठरवले तरी अनेकांकडून होत नाही. पण यापासून लांब झाल्यावर काय परीणाम होतील माहित आहेत का?

प्रत्येक जण आजकाल सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतं. व्हॉटसअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि हल्ली तरुणांमध्ये सगळ्यात जास्त वापरले जाणारे टिकटॉक… जर तुम्हाला काही मिनिटांपुरत या सगळ्या सोशल साईटसपासून दूर केले तर अगदी बैचेन झाल्यासारखे होते. पण याच सोशल मीडियाचा वापर जर तुम्ही केला नाहीत तर काय होईल हे तुम्हाला माहित आहे का? हे माहित करुन घेण्यासाठी लँडस्टेन युनिव्हर्सिटी आणि व्हिएन्ना युनिव्हर्सिटीने एक सर्व्हेक्षण केले आणि त्यात या सोशल मीडियापासून लांब राहिल्यामुळे आरोग्यावर काय परिणाम होतो हे समोर आले आहे.

काय आहे या सर्व्हेक्षणात?

सर्व्हेक्षणानुसार १५२ लोंकावर प्रयोग करण्यात आला. यात सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्यांना ७ दिवसांसाठी लांब ठेवण्यात आले. त्यांच्यातील स्वभाव बदलाला टिपण्यासाठीच हे सर्व्हेक्षण करण्यात आले. फेसबुक आणि व्हॉटसअॅपच्या अती वापरामुळे इतर गोष्टींमधील रस कमी होऊन जातो. इतरांशी संवाद साधणे नकोसे होते. फोनमध्ये डोकं खुपसून तासनतास त्यात घालवण्याची इच्छा होते. शिवाय चांगले वाईट याचे भानही राहत नाही असे काही मुद्दे समोर आले आहे.

- Advertisement -

सोशल मीडियापासून दूर राहू शकत नाही

हा प्रयोग करताना १५२ पैकी ९० जणांना सोशल मीडियापासून लांब राहणे जमले नाही. त्यांना आजूबाजूच्या परिस्थितीशी मिळते जुळते घेण्यात त्रास झाला. सोशल मीडियापासून दूर राहण्यापेक्षा त्यांनी लोकांपासून दूर राहणे त्यांना अधिक सोयीस्कर वाटले त्यामुळे साहजिकच ५० % अधिक जण या सर्व्हेक्षणाशी जुळवून घेऊ शकले नाही.

सोशल मीडियापासून लांब राहिल्याचे परीणाम

तर ७ दिवसांचे या सर्व्हेक्षणात काहींनी चांगली कामगिरीेदेखील केली. अर्थात ती सोशल मीडियापासून लांब राहिली. पण ती अधिकच तणावाखाली गेल्याचे जाणवले. कारण ज्यावेळी त्यांना साधा मेसेज ऑपरेट करायला दिला त्यावेळी त्यांनी सगळ्यात आधी त्यांच्या मित्र मैत्रिणींशी बोलण्याचा प्रयत्न केला. आपण काहीतरी मागे टाकून आलो आहोत ही भावना त्यांच्यात अधिक तीव्र झाली होती. त्यामुळे त्यांच्यातील स्वभाव बदल चटकन जाणवत होता आणि तो अधिक त्रासदायक असल्याचे देखील या सर्व्हेक्षणातून समोर आले आहे.१५२ पैकी ७० टक्के महिलांचा यात समावेश होता. तर १८ ते ८० या वयोगटातील माणसे यात सहभागी झाली होती.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -