घरदेश-विदेशVideo: भारतीय वायुदलाच्या जवानांचे थरारक प्रात्यक्षिक

Video: भारतीय वायुदलाच्या जवानांचे थरारक प्रात्यक्षिक

Subscribe

भारतीय वायुदलाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त गाझियाबादच्या हिंडन एअर बेसवर, वायुदलाच्या जवानांकडून विविध प्रकारची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली.

भारतीय वायुदल अर्थात इंडियन एअरफोर्स ही भारताची शान आहे. आज देशभरात ६८वा इंडियन एअरफोर्सडे साजरा केला जात आहे. गाझियाबादच्या हिंडन एअर बेसवर आज भारतीय वायुदलाकडून विशेष प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. यावेळी भारतीय वायुदलाच्या जवानांनी खास हवेमध्ये थरारक प्रात्यक्षिक करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या थरारक प्रात्यक्षिकांची  गेल्या २ महिन्यांपासून तयारी सुरु होती. याशिवाय आज गाझियाबादमध्ये भारतीय वायुदलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जवानांना पुरस्कार बहाल करत त्यांचा सन्मान करण्यात आला. ६८ व्या एअरफोर्स डेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आजच्या सोहळ्यामध्ये व्हिंटेज डकोटा, फ्रंट लाईन जेटस् सुखोई ३०, जॅग्वार आणि एमआयजी २९ या फायटर विमानांची परेडही झाली. या परेडमध्ये ‘तेजस’ हे स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमानही सहभागी झाले.

वायुदलाच्या जवानांचे हवाई प्रात्यक्षिक

या परेडचे मुख्य आकर्षण ठरले १९४०च्या बनावटीचे डाकोटा विमान. विशेष म्हणजे हे विमान प्रथमच परेडमध्ये उतरवण्यात आले होते. १९४० पासून ते १९८८ पर्यंत डाकोटा डीसी-३ युनिटने भारतीय वायुसेनेत सेवा दिली. याशिवाय वायुदलाच्या ‘अकाशगंगा’ या टीमच्या सदस्यांनीही परेडमध्ये शानदार संचलन केले. A-३२ या विमानातून खाली उतरत जवानांनी थरारक प्रात्यक्षिक सादर केले. याव्यतिरीक्त सारंग हेलिकॉप्टर टीम आणि सूर्यकिरण एअरोबेटीक टीमनेही या परेडमध्ये संचलन केले.


वाचा: ‘सुखोई ३०’ हे फायटर विमान होणार आणखी भेदक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -