How’s the Josh; सैनिकांना मिळणार ७२ हजार असॉल्ट रायफल

भारतीय सैन्यासाठी संरक्षण मंत्रालयाने फार महत्त्वाचा करार केला आहे. या कराराअंतर्गत भारतीय सैन्यांना ७२ हजार असॉल्ट रायफल मिळणार आहेत.

New Delhi
Indian soldiers will get 72 thousand Sig Sauer Assault rifles
सैनिकांना मिळणार ७२ हजार असॉल्ट रायफल

भारतीय सैन्याकडेही आधुनिक शस्त्रास्त्र साठा उपलब्ध व्हावा, या हेतूने सरकारने रायफलचा करार केला आहे. या कराराअंतर्गत आता भारतीय सैनिकांच्या हातात आता असॉल्ट रायफल पडणार आहे. मजबूत सुरक्षेसाठी शस्त्रास्त्रे आधुनिक असणे जरुरीचे आहे. त्याच धर्तीवर या रायफलचा करार करण्यात आला आहे. भारत सरकारने नुकतेच या कराराच्या कागदावर स्वाक्षरी केली असून येत्या वर्षभरात या रायफल भारतीय सेनेकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. संरक्षण मंत्रालयाने १ फेब्रुवारीला रायफलच्या खरेदीच्या प्रस्तवाला मंजूरी दिली आहे. संरक्षण मंत्रालयाचा हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे म्हटले जात आहे.

अमेरिकेच्या सैन्यांकडेही आहे असॉल्ट रायफल

Sig Sauer Assault असे या रायफलचे नाव आहे. भारताने ७२ हजार असॉल्ट रायफल विकत मागवल्या आहेत. अमेरिका आणि युरापोतील काही देशांच्या सैन्याकडे याच राइफल आहेत. त्यामुळे या रायफलची खरेदी करण्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले जात आहे. या कराराशी जुडलेल्या एका अधिकारीने न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, ‘ एका अमेरिकी कंपनी सोबत हा करार झाला असून करारानुसार एका वर्षाच्या आत या रायफलची डिलव्हरी कंपनीला करणे अनिवार्य आहे.’