देशाचे पहिले लोकपाल पिनाकी घोष यांचा शपथविधी संपन्न

राष्ट्रपती रामनाथ कोविदं यांनी त्यांना लोकपाल पदी नियुक्तीची शपथ दिली, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते.

New Delhi
पहिले लोकपाल पिनाकी घोष यांचा शपथविधी संपन्न

सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती पिनाकी घोष यांची केंद्र सरकारने रविवारी देशाचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्तीची घोषणा केली. त्यानंतर आज दिनांक २३ मार्च रोजी राष्ट्रपती भवनात रामनाथ कोविंद यांनी त्यांना देशाच्या पहिल्या लोकपाल पदी नियुक्तीची शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती वेंकैया नायडू, मुख्या न्यायाधीश रंजन गोगोई उपस्थित होते. लोकपालांच्या नियुक्ती सोबत काही न्यायिक सदस्यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. न्या. दिलीप बी भोसले, न्या. प्रदीपकुमार मोहंती, न्या. अभिलाषा कुमारी, न्या. अजयकुमार त्रिपाठी हे न्यायिक सदस्य असतील. न्यायिक सदस्यांबरोबर दिनेशकुमार जैन, अर्चना रामसुंदरम, महेंद्रसिंह आणि डॉ. इंद्रजितप्रसाद गौतम हे इतर चार सदस्यही असणार आहेत.

पिनाकी घोष यांच्या विषयी

देशाचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेले पिनाकी घोष हे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश होते. त्याच प्रमाणे आंध्र प्रदेश हायकोर्टाचे ते मुख्य न्यायाधीशही होते. राष्ट्रीय मानवधिकार आयोगाचे ते सदस्य आहेत. मानवधिकार कायदा तज्ञ म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. तमिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललीता यांच्या निकट वर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शशिकला यांना शिक्षा सुनावल्या नंतर ते चर्चेत आले होते. घोष यांच्या पाच पिढ्या पासून कायदे क्षेत्रातील परंपरा आहे. त्यांचे वडिल शंभु चंद्र घोष कोलकता सुप्रिमकोर्टात मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते.

लोकपालने भ्रष्टचाराला आळा

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मागील अनेक वर्षांपासून लोकपालची मागणी केली होती. केंद्रीय सतर्कता आयोगा सोबत लोकपाल काम करणार आहे. लोकपालच्या कक्षेमध्ये पंतप्रधाना पासून ते केंद्रीय मंत्री, खासदार तसेच सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करता येणार आहे. सीबीआय सह कोणत्याही तपास यंत्रणेची चौकशी लोकपालच्या कक्षेतुन करता येणार आहे. दरम्यान, आचार संहिता लागू केल्यानंतर लोकपाल नियुक्ती केल्याने विरोधी पक्षांनी यावर टीका केली आहे.

 

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here