घरदेश-विदेशजम्मू-काश्मीर : टोल नाक्यावरील चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान; एक जवान जखमी

जम्मू-काश्मीर : टोल नाक्यावरील चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान; एक जवान जखमी

Subscribe

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात भारतीय जवानांचे अभियान सुरु आहे. जवानांना दहशतवाद्यांबद्दल माहिती मिळताच नागरोटा येथे सुरक्षा अधिक कडक केली गेली. प्रत्येक नाक्यावर येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली. यावेळी सुरक्षा दलांनी बान टोल प्लाझाजवळ नाका लावला होता. वाहनांच्या तपासणी दरम्यान दहशतवाद्यांच्या गटाने पहाटे पाच वाजता सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांमध्ये आणि जवानांमध्ये जोरदार चकमक झाली. ज्यामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. या चकमकीनंतर संपूर्ण परिसरात कडकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवाय, जवानांकडून सर्व वाहनांची तपासणी देखील केली जात आहे.

गुरुवारी पहाटे पाच वाजता नगरोटा येथील बान टोल नाक्याजवळ ट्रकमधून आलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला आणि जंगलाकडे धावू लागले. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीत ४ अतिरेक्यांना कंठस्नान घातले. चकमकीमुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. या चकमकीत सैएक जवान जखमी झाला आहे. जखमी जवान कुलदीप राज यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुलदीप राज यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. जम्मू-श्रीनगर महामार्गावरून ४-५ दहशतवादी ट्रकद्वारे काश्मीरला जाण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेराव घातला त्यावेळी चकमक झाली. या घटनेमुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गालगतच्या नगरोटा येथे सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -