us election-‘जो बायडेन’ अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष

Joe Biden

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल लागला असून जो बायडेन हे अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत.
दरम्यान काही वेळापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण जिंकल्याचं एक टि्वट केले होते. यामुळे काहीवेळासाठी सगळीकडे संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते. मात्र अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी बायडेन यांचा विजय झाल्याचे वृत्त दिले आहे.

त्यानंतर बायडेन यांनीही टि्वट करत अमेरिकेच्या नागरिकांचे आभार मानले. अमेरिकेच्या जनतेने मला राष्ट्राध्यक्षपदी
पोहचवल हा मी माझा सन्मान समजतो. तसेच मी अमेरिकेच्या नागरिकांसाठी चांगल काम करणार आहे. असा
आश्वासनही त्यांनी या टि्वटमध्ये दिले आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहीले होते. सुरुवातीला ट्रम्प आणि बायडेन यांच्यात जोरदार लढत सुरू होती. त्यावरूनच बायडेन हेच जिंकणार असे भाकित करण्यात आले होते.