अनंतनागमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक, २ दहशतवादी ठार

अनंतनागच्या वाघा भागात चकमक सुरू झाल्यानंतर काश्मीर झोनच्या पोलिसांनी ट्विट केले

New Delhi
terrorist Asif killed by indian army in kashmir
जम्मू-काश्मीर

सोमवारी जम्मू – काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सुरू असलेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले. तर आज मंगळवारी देखील दक्षिण काश्मीरमधील बिजबेहाराच्या वाघामा गावात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत २ दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे. अनंतनागच्या वाघा भागात चकमक सुरू झाल्यानंतर काश्मीर झोनच्या पोलिसांनी ट्विट करून माहिती दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच जेकेपी आणि सुरक्षा दल घटनास्थळी आहेत.

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिस, 3RR सैन्य आणि CRPF यांच्या संयुक्त पथकाने या भागात दहशतवाद्यांसंदर्भात विशिष्ट शोध मोहीम राबविली. सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने संशयास्पद ठिकाणी घेरल्यामुळे लपलेल्या दहशतवाद्यांनी शोध मोहिमेच्या लोकांवर गोळीबार केला, त्यानंतर चकमकीला सुरुवात झाली.

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमकीचीही काश्मीर पोलिसांनी माहिती दिली आहे.  जून महिन्यात दक्षिण काश्मीरमध्ये हा १४ वा सामना आहे ज्यामध्ये आतापर्यंत ३८ दहशतवादी ठार झाले आहेत. काश्मीरमध्ये दहशतवादाची सुरूवात झाल्यापासून यावर्षी जून महिन्यात सर्वाधिक दहशतवादी ठार झाले आहेत. आतापर्यंत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या ११८ वर पोहोचली आहे.

यापूर्वी गेल्या आठवड्यात पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात हिजबुल मुजाहिद्दीनच्या सर्व अतिरेक्यांना ठार करण्यात आले होते. त्यामुळे त्राल भागात आता हिजबुल मुजाहिद्दीनचा एकही दहशतवादी नाही आहे, असा दावा जम्मू-काश्मीर पोलिसांनी शुक्रवारी केला. १९८९ मध्ये काश्मीरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांनी ठाण मांडला होता. दरम्यान, सुरक्षा दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी हिजबुल मुजाहिद्दीनच्या सर्व दहशतवाद्यांना कंठस्नान घातलण्यात आले होते.


जम्मू – काश्मीरच्या अनंतनागमधील चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here