घरताज्या घडामोडीLive Update: ड्रग्ज प्रकरण: मुंबईत पोलिसांनी १३ जणांना केली अटक!

Live Update: ड्रग्ज प्रकरण: मुंबईत पोलिसांनी १३ जणांना केली अटक!

Subscribe

मुंबई पोलिसांनी ड्रग्ज संबंधित प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केले असून आतापर्यंत सुमारे १४६.१४३ किलो एम.डी (मेफेड्रॉन) जप्त केले आहेत. याची किंमत सुमारे ५८ कोटी आहे. याप्रकरणी आतपर्यंत १३ लोकांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

गेल्या २४ तासांत देशात ४३ हजार ८२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४९२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ९३ लाख ९ हजार ७८८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३५ हजार ७२५ रुग्णांचा मृत्यू झाला असून ८७ लाख १८ हजार ५१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

उद्या (शनिवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदीत पुणे दौऱ्यावर येणार आहेत. सीरम इन्स्टिट्यूला मोदी १०० देशांच्या राजदूतांसह भेट देणार आहेत. तसेच सीरमच्या ‘कोविशिल्ड’ लस निर्मितीचा आढावा घेणार आहेत.


जगातील कोरोनाबाधितांच्या आकड्याप्रमाणाचे कोरोनामुक्त होण्याचा आकडा देखील वाढताना दिसत आहे. वर्ल्डोमीटर आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ६ कोटी १३ लाख २ हजारांहून अधिक आहे. यापैकी आतापर्यंत १४ लाख ३७ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ४ कोटी २३ लाख ९३ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.


गुरुवारी दिवसभरात राज्यात ६,४०६ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १८,०२,३६५ झाली आहे. राज्यात ८५,९६३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात गुरुवारी ६५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४६,८१३ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६ टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -