Live Update: राज्यात गेल्या २४ तासात १२,२५८ नव्या रूग्णांची नोंद

Live Update News

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित राज्य महाराष्ट्र असले तरी येथील रिकव्हरी रेट गेल्या काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे. पण वाढता मृत्यूदर राज्यातील अद्याप चिंताजनक आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १२ हजार २५८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३७० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १४ लाख ६५ हजार ९११ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३८ हजार ७१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. (सविस्तर वाचा)


मुंबईत आज कोरोनाचे १ हजार ६२५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या २ लाख १७ हजार ०९० वर पोहचली आहे. तर ४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९ हजार १९९ वर पोहचला आहे. तर चिंतेची बाब म्हणजे सध्या मुंबईत २३ हजार ९७६ Active रुग्ण असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहेत.


धारावीत आज २२ कोरोना रूग्णांची नोंद

धारावीत आज २२ कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली असून धारावीतील बाधितांचा आकडा हा ३ हजार २८० वर पोहोचला आहे. यापैकी १९२ रूग्ण सध्या अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. आणि दिलासादायक २ हजार ७९५ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

 


कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. दिगंबर शिर्के

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ सांख्यिकी विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दिगंबर तुकाराम शिर्के यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी डॉ. शिर्के यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ. शिर्के यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. (सविस्तर वाचा)


मुंबई मालवणी परिसरातील 45 वर्षीय महिलेकडून 25 ग्रॅम ड्रग्स ताब्यात घेतले. मुंबई पोलिसांनी आज या महिलेला अटक केली.


देशातील २५ जिल्ह्यातील ४८ % मृत्यू फक्त कोरोनामुळे झाले आहेत. या २५ जिल्ह्यापैकी १५ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य मंत्रालय या राज्यांशी चर्चा करीत आहे.


आरे कॉलनी गोरेगाव चिमुरडीवर अत्याचार

यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चिञाताई वाघ यांच्या सोबत या पिडीत मुलीच्या वडीलांची प्रत्यक्ष भेंट घेतली.
तसेच अशा महिला व मुलींच्या अब्रुचे लचके तोडले जात आहेत.याप्रकरणा संदर्भात पोलिस उपायुक्त स्वामी यांची भेंट घेऊन झाल्या प्रकरणा संदर्भात कठोरात कठोर कारवाईची मागणी केली. (सविस्तर वाचा)


पायल घोषविरोधात रिचा चढ्ढा कोर्टात, मानहानीचा दावा

दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (लैंगिक गैरवर्तनाचे आरोप करणाऱ्या अभिनेत्री पायल घोषच्या अडचणी वाढल्या आहेत. अभिनेत्री रिचा चढ्ढाने (पायल घोषविरोधात मुंबई हायकोर्टात १.१ कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. रिचाने दाखल केलेल्या मानहानी केसवर मुंबई हायकोर्ट बुधवारी निर्णय देणार आहे.


मराठा आरक्षण स्थगितीच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी परीक्षा पुढे ढकला, आमदार विनायक मेटे यांच्या उपस्थितीत मराठा विद्यार्थी परिषदेची मागणी


बॉलीवूड अभिनेता अजय देवगण यांचे भाऊ अनिल देवगण यांचा अकाली मृत्यू

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण यांचे भाऊ अनिल देवगण यांचा अकाली मृत्यू झाला असून याबाबत स्वतः अजयने ट्विट करत माहिती दिली आहे. अनिल देवगण यांच्या मृत्यूचे कारण त्यांनी स्पष्ट केले नसले तरी त्यांच्या जाण्याने कुटुंबात पोकळी निर्माण झाली असल्याचे नमूद केले आहे. (सविस्तर वाचा)


हरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याबाबत त्यांनी स्वतः सांगितले आहे.


पंजाबचे आरोग्यमंत्री बलबीर सिद्धू यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.


राज्यात गेल्या २४ तासांत १०४ नवे कोरोनाबाधित पोलीस आढळले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा २४ हजार २५४वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत २५३ जणांचा मृत्यू झाला असून २१ हजार ४२३ पोलीस कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या २ हजार ५७८ पोलिसांवर उपचार सुरू आहे, अशी माहिती महाराष्ट्र पोलीस दलाने दिली आहे.


रिया आणि शौविकसह इतर आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने आणखीन १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. २० ऑक्टोबरपर्यंत रिया, शौविक, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत, बासित परिहार आणि झैद विलात्राच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे.


चित्रपटप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. १५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेने चित्रपटगृह सुरू होणार आहे. यादरम्यान प्रेक्षकांमध्ये एका सीटचे अंतर ठेवले जाणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.


देशात गेल्या २४ तासांत ६१ हजार २६७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ८८४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ६६ लाख ८५ हजार ८३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३ हजार ५६९ जणांचा मृत्यू झाला असून ५६ लाख ६२ हजार ४९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ९ लाख १९ हजार २३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


देशात सोमवारी दिवसभरात १० लाख ८९ हजार ४०३ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहे. त्यामुळे देशात आतापर्यंत झालेल्या नुमन्यांच्या चाचणीचा आकडा ८ कोटी १० लाख ७१ हजार ७९७वर पोहोचला आहे, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


राहुल गांधींच्या ट्रॅक्टर रॅलीचा आज शेवटचा दिवस आहे. आज ट्रॅक्टर रॅली पंजाबहून हरयाणात पोहोचणार आहे. पण यावेळेस जमावासह आल्यास प्रवेश नाही, असा इशार हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिल आहे. त्यामुळे हरयाणाच्या सीमेवर भाजप-काँग्रेस कार्यकर्ते भिडण्याची शक्यता आहे.


कृषी कायद्यांबाबत मुख्यमंत्र्यांची आज शेतकरी संघटनांशी चर्चा होणार आहे. आज दुपारी ४ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर यासंदर्भात बैठक होणार आहे. मंत्रिमंडळ उपसमिती, शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची ही बैठक असणार आहे. मुख्यमंत्री विधेयकातील त्रुटी, जाचक अटीसंदर्भात मतं जाणून घेणार आहेत.


जगातील सातत्याने कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. त्याचप्रमाणे कोरोना रुग्ण बरे होण्याचा देखील आकडा वाढताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ३ कोटी ५६ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी १ लाख ४५ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच २ कोटी ६८ लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


राज्यात सोमवारी १० हजार २४४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४ लाख ५३ हजार ६५३ झाली आहे. राज्यात २ लाख ५२ हजार २७७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात काल २६३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या ३८ हजार ३४७वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा