Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी धक्कादायक! कोरोना लस घेतल्यानंतर महिला डॉक्टरला अर्धांगवायूचा झटका

धक्कादायक! कोरोना लस घेतल्यानंतर महिला डॉक्टरला अर्धांगवायूचा झटका

मेक्सिकोमध्ये एका महिला डॉक्टरने कोरोना लस घेतल्यानंतर त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याची घटना समोर आली आहे.

Related Story

- Advertisement -

जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या आता ८ कोटींवर जाऊन पोहोचली आहे. या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील सर्वच राज्यात ड्राय रनला सुरुवात झाली आहे. तर कोरोना लसीवर युद्धपातळीवर संशोधन सुरु असून काही ठिकाणी कोरोना लसीचे साईड इफेक्ट देखील होत असल्याचे समोर आले आहेत. पोर्तुगालमध्ये कोरोनावरील फायझर लस घेतल्यानंतर एका ४१ वर्षीय आरोग्य कर्मचारी सोनिया असेवेडो यांचा ४८ तासांच्या आता मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. ही घटना ताजी असतानाच एका डॉक्टरांनी कोरोनावरील लस घेतल्यानंतर त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याची घटना समोर आली आहे.

नेमके काय घडले?

मेक्सिकोमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर एका महिला डॉक्टराला अर्धांगवायूचा झटका आला आहे. कार्ला सेसेलिया पेरेज, असे महिला डॉक्टरचे नाव आहे. या महिला डॉक्टरने लस घेतल्यानंतर अर्ध्या तासातच त्यांना अशक्तपणा, डोकेदुखी श्वास घेण्याचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मेक्सिकोच्या आरोग्य मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. लसीचा दुष्परिणाम झालेल्या डॉक्टर कार्ला पेरेझ यांच्या मेंदूत आणि मणक्यात सूज आली होती. त्यावर उपचार करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

कुटुंबियांनी केली चौकशीची मागणी

- Advertisement -

डॉक्टर कार्ला यांना अँटीबायोटीकची Allergies असल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर कार्ला यांना अर्धांगवायूचा झटका हा लसीमुळे आला, असे ठामपणे सांगता येणार नाही. पण, लस घेतल्यामुळे हा दुष्परिणाम झाला का याची चौकशी करावी, अशी मागणी डॉक्टरांच्या कुटुंबियांनी केली आहे.

डॉक्टर कार्ला या ३२ वर्षीय असून त्यांना फायजरची लस दिली गेली. त्यानंतर त्यांची काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडली. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना कोणताही गंभीर आजार किंवा साइड इफेक्ट्स झाले नाहीत आणि त्या निरोगी होत्या, असे सांगण्यात येत आहे.


- Advertisement -

हेही वाचा – पंतप्रधान मोदींची प्रशासनशैली एकाधिकारशाहीची; प्रणब मुखर्जी यांच्या आत्मचरित्रातून तिखट टीका


- Advertisement -