घरताज्या घडामोडीविकास दुबेच्या एन्काऊंटरला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

विकास दुबेच्या एन्काऊंटरला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

Subscribe

कुख्यात गुंड विकास दुबेचं आज सकाळी उत्तर प्रदेशमध्ये एन्काऊंटर झाल्यानंतर त्याविरोधात आता नवी मुंबईतल्या वकिलांनी थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. विकास दुबेला गुरुवारी कानपूर पोलिसांनी अटक केली होती. त्याला आज पहाटे कानपूरला आणलं जात असताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. त्यानंतर विकास दुबेने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता झालेल्या चकमकीत विकास दुबे गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलं, मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं, अशी माहिती पोलिसांकडून दिली गेली आहे. मात्र, हे फेक एन्काऊंटर असून सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची स्यू मोटो दखल घ्यावी, अशी मागणी नवी मुंबईतल्या वकिलांनी केली आहे.

petition

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -