घरताज्या घडामोडीनिर्भयाच्या दोषींना फाशीची अंतिम तारीख ठरली!

निर्भयाच्या दोषींना फाशीची अंतिम तारीख ठरली!

Subscribe

दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींनी अखेर फाशी देण्याची अंतिम तारीख ठरली आहे. येत्या १ फेब्रुवारीला या चौघांना फाशी दिलं जाणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे प्रलंबित असलेल्या दयेच्या अर्जामुळे आधी जाहीर केलेल्या २२ जानेवारी या तारखेला फाशीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही हे स्पष्ट झालं होतं. आता मात्र राष्ट्रपतींनी मुकेश कुमार या आरोपीचा प्रलंबित दयेचा अर्ज देखील फेटाळला आहे. त्यामुळे त्यांना १ फेब्रुवारीला फाशी होणार हे आता निश्चित झालं आहे. साधारणपणे राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर १४ दिवसांच्या अवधीमध्ये फाशी देता येत नाही. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रपतींची अर्ज फेटाळला म्हणून आजपासून १४ दिवसांनी म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी या चौघांना फाशी दिली जाणार आहे. यासंदर्भात दिल्ली कोर्टाने २२ जानेवारीसाठी दिलेलं डेथ वॉरंट रद्द ठरवून १ फेब्रुवारीचं नवीन डेथ वॉरंट जारी केलं आहे.


वाचा सविस्तर – निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा थांबली; दया अर्ज ठरला अडसर!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -