Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी खुशखबर! दिल्लीत नव्हे, तर संपूर्ण देशात मोफत मिळणार लस - आरोग्यमंत्री

खुशखबर! दिल्लीत नव्हे, तर संपूर्ण देशात मोफत मिळणार लस – आरोग्यमंत्री

Related Story

- Advertisement -

नववर्षाच्या सुरुवातीपासूनच कोरोना संदर्भात सरकार देशवासियांना दिलासा देणारे निर्णय घेत आहे. शुक्रवारी पुण्याच्या सीरम इंस्टिट्यूट आणि ऑक्सफर्डमार्फत तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड लसीला पहिल्या टप्प्यातील परवानगी मिळाली आहे. तसेच आजपासून देशभरात लसीकरणाच्या ड्राय रनला देखील सुरुवात झाली आहे. आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कोरोना संदर्भात आनंदाची बातमी दिली आहे. आता दिल्लीतच नव्हे, तर संपूर्ण देशात कोरोना लस मोफत मिळणार असल्याचं हर्ष वर्धन यांनी जाहीर केलं आहे.

सीरम इंस्टिट्यूटच्या लसीला मान्यता दिल्यानंतर लसीची किंमत किती असणार याकडे सर्वांचं लक्षण होतं. पण या प्रश्नाचं उत्तर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी स्वतः दिलं आहे. कोरोना लस ज्याप्रमाणे दिल्लीत मोफत मिळणार आहे, त्याप्रमाणे सर्व राज्यात मोफत मिळणार आहे का? हा प्रश्न प्रसारमाध्यमांनी हर्ष वर्धन यांना विचारल्यावर ते म्हणाले की, ‘कोरोना लस फक्त दिल्लीत नाही, तर संपूर्ण देशात मोफत मिळणार आहे.’

- Advertisement -

दरम्यान आजपासून प्रत्येक राज्यातील काही शहरांमध्ये लसीकरणाच्या ड्राय रनला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आज आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी दिल्लीतील जीटीबी हॉस्पिटलची पाहणी करून ड्राय रनचा आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले की, ‘कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नये, असे मी देशातील नागरिकांना आवाहन करतो. सुरक्षितता आणि लसीची कार्यक्षमतेची तपासणी करणे, याला आमचे प्राधान्य आहे. दरम्यान पोलिओ लसीकरणाच्या वेळी अनेक अफावा पसरल्या होत्या. पण लोकांनी अफवांकडे दुर्लक्ष करून पोलिओची लस घेतली आणि भारत पोलिओमुक्त झाला.’

पहिल्या टप्प्यात ३ कोटी कोविड योद्ध्यांना मोफत लस मिळणार

- Advertisement -

कोरोनाच्या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात १ कोटी आरोग्यसेवक, २ कोटी इतर कोविड योद्ध्यांना मोफत लस दिली जाणार आहे. संपूर्ण देशात मोफत लस देण्याचं विधान केल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.


हेही वाचा – देशभरात आजपासून कोरोना लसीचा ड्राय रन


 

- Advertisement -