करोनाच्या आड चीन-पाकिस्तानची हिंदी महासागरात हेरगिरी

mumbai

जगभरात करोना व्हायरसने कहर केला असतानाच या परिस्थितीचा गैरफायदा घेत चीन व पाकिस्तानने हिंदी महासागरात हेरगिरी सुरू केली आहे. यापार्श्वभूमीवर चीनी नौदलाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय नौदलानेही P-8 आय सर्विलान्स ही लढाऊ विमाने तैनात केली आहेत. तसेच यासाठी सॅटेलाईटचीही मदत घेतली जाणार आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार नौदलाच्या लढाऊ जहाजांच्या माध्यमाने रेड सी पासून मलक्का येथे जाणाऱ्या सागरी मार्गावर लक्ष ठेवण्यात येत आहे. याचदरम्यान पाकिस्तानचे यारमुक (PNS Yarmook) हे लढाऊ जहाज आमच्या दृष्टीस पडले. जे रोमानियातून रेड सी मार्गे कराचीला जात होते. तसेच अनेकवेळा फासर व अदन खाडीजवळ समुद्री चाच्यांवर लक्ष ठेवणाऱ्या लढाऊ जहांजावरील अधिकाऱ्यांनीही पाकिस्तान व चीनच्या समुद्रातील हालचाली वाढल्याचे सांगितले आहे. सध्या भारतीय नौदलाने हिंदी महासागर क्षेत्रात चीनी नौदलाच्या Y901 श्रेणीतील लढाऊ जहाजाला ट्रॅक केले आहे. जो एक टँकर आहे. अशी माहिती नौदलाच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here