घरदेश-विदेशभारतीय जवान समजून पाकने त्यांच्याच जवानाला मारले

भारतीय जवान समजून पाकने त्यांच्याच जवानाला मारले

Subscribe

स्थानिक नागरिकांनी तो भारतीय विंग कमांडर असल्याचा गैरसमज झाला आणि त्यांनी त्यास मारहाण करण्यास सुरुवात केली. या जबर मारहाणीत शहाजुद्दीन गंभीर जखमी झाला.

भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना शुक्रवारी पाकने भारताच्या हवाली करण्यात आले. तर पाकिस्तानमध्ये पाकच्या वायुदलाच्या विंग कमांडर शहाजुद्दीनला भरतीय जवान समजून पाकिस्तानकडून मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानी वायुदलाचे विंग कमांडर शहाजुद्दीन एफ-१६ विमानाचं उड्डाण करत होते. भारतीय विमानाने यावेळी एफ-१६ या विमानाचा वेध घेतला. यानंतर शहाजुद्दीन पॅराशूटच्या सहाय्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये नौशेरा सेक्टरमध्ये खाली उतरला होता.

भारतीय जवान असल्याचा गैरसमज 

फर्स्ट पोस्ट या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार शहाजुद्दीन हा सुखरूप खाली उतरण्याआधीच जखमी झाला होता. त्याच्या अंगावरील गणवेश फाटलेल्या अवस्थेत असल्याने तेथील स्थानिक नागरिकांनी तो भारतीय विंग कमांडर असल्याचा गैरसमज झाला आणि त्यांनी त्यास मारहाण करण्यास सुरुवात केली. या जबर मारहाणीत शहाजुद्दीन गंभीर जखमी झाला.

- Advertisement -

पाकचा दावा

दरम्यान, भारताची २ विमानं पडून २ जवानांना ताब्यात घेतले, असा दावा पाकिस्तानने केला होता. तसेच भारताची २ विमान काश्मीरमध्ये कोसळली असून ही विमानं पाकनेच पडली, असा दावा पाकिस्तानने केला आहे. परंतु, या चकमकीच्या वेळी भारतीय जवान समजून पाकने त्यांच्याच जवानाला ठार मारले.

स्थानिक जमावाकडून हल्ला 

शहाजुद्दीन यांचे एफ-१६ हे विमान कोसळ्याचे पहिले वृत्त लंडनमधील वकील खालिद उमर यांनी दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. शहाजुद्दीन यांच्या कुटुंबीयांपैकी एकाने हे वृत्त आपल्याला खासगीरित्या दिल्याचे खालिद यांनी म्हटले आहे. खालिद यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहाजुद्दीन यांच्या एफ-१६ विमान कोसळत असताना, ते पॅराशूटद्वारे खाली उतरले. तो पाकव्याप्त काश्मीरमधील खोऱ्याचा भाग होता. तेथील स्थानिक नागरिकांनी शहाजुद्दीन यांच्यावर हल्ला केला. यात ते गंभीरपणे जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -