सलग २० व्या दिवशी पेट्रोल-डिझेलची दरवाढ

पेट्रोल-डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ सुरुच आहे. आज सलग २० व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या मुंबईकरांनी मोदी सरकारला 'अच्छे दिन कधी येणार' असा सवाल केला आहे.

MUMBAI
petrol diesel price increase
पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

पेट्रोल-डिझेलच्या दर वाढीचे सत्र सुरुच आहे. सलग २० व्या दिवशी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे देशभरातील जनता आणखी सतंप्त झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये २८ पैशांनी तर डिझेलच्या दरामध्ये २४ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल ८८.६७ रुपये प्रतीलिटर तर डिझेल ७७.८२ रुपये प्रतीलिटर दराने मिळत आहे. महागाईमुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांनी अच्छे दिन केव्हा येणार असला सवाल विचारला जातोय.

राजधानीतही पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या

मुंबईमध्ये पेट्रोलच्या किंमत ९० चा आकडा गाठला आली आहे. तर डिझेलची किंमत ८० चा आकडा गाठला आली आहे. तर राजधानीमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये २८ पैशांनी आणि डिझेलच्या दरामध्ये २२ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोल ८१.२८ रुपये प्रतीलिटर तर डिझेल ७३.३० रुपये प्रतीलिटर झाला आहे. इंधनाच्या दरामध्ये होणाऱ्या वाढीमुळे जनता हैराण झाली आहे. या दर वाढीमुळे इतर वस्तूंच्या किंमती देखील वाढल्या आहेत.

अच्छे दिन कधी येणार?

मोदी सरकार आल्यापासून महागाई वाढली आहे. गेल्या चार वर्षापासून मोदी सरकार अच्छे दिनाची वार्ता करत आहे. मात्र अच्छे दिन जनतेला दिसलेच नाहीत. त्यामुळे आता संतप्त झालेल्या मुंबईकरांनी देखील मोदी सरकारला सवाल केले आहेत. ‘सरकार नक्की काय करतंय तेच कळत नाही? त्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणे आवश्यक आहे. तसं न होता दर वाढतच चालले आहेत. अच्छे दिन कधी येणार’, असा प्रश्न मुंबईकरांनी मोदी सरकारला विचारला आहे. .