घरगणपती उत्सव बातम्यादीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन

दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन

Subscribe

राज्यभरात आज दीड दिवसाच्या गणपतीचा विसर्जन सोहळा पार पडणार आहे. मुंबईतील प्रमुख समुद्र किनारे आणि तलावांमध्ये बाप्पाचे विसर्जन केले जाईल.

यंदाच्या गणेशोत्सवातील पहिला विसर्जन सोहळा आज पार पडणार आहे. मुंबईकर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहेत. प्रामुख्याने दीड दिवसांच्या विसर्जनामध्ये घरगुती गणपतींचा समावेश असतो. गणेश चतुर्थीला आगमन झालेल्या गणराया आज दुसऱ्या दिवशी विसर्जीत केले जाते. साधारणतः दुपारनंतर बाप्पाची आरती करून भाविक गणपती विसर्जनाची मिरवणूक काढतील. ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’, जयघोषात राज्यभर ठिकठिकाणी दीड दिवसाच्या बाप्पाचा विसर्जन सोहळा पार पडेल.

मुंबईत कुठे होणार विसर्जन

प्रामुख्याने काही भक्तांच्या घरामध्ये दीड दिवसाचे गणपती बसवले जातात. त्यांच्या विसर्जनाचा सोहळा आज पार पडणार आहे. मुंबईत मोठ्या संख्येने गणरायाच्या विसर्जनाचा सोहळा पार पडतो. मुंबई ही समुद्र किनाऱ्याने वेढलेली आहे. त्यामुळे बहुतांश भाविक आपल्या बाप्पाचे विसर्जन या समुद्रातच करतात. त्यामुळे मुंबईतील काही ठराविक समुद्र किनारी आपल्याला विसर्जनाचा सोहळा पााहायला मिळेल. यामध्ये चर्नी रोड येथील गिरगाव चौपाटी, विलेपार्लेतील जुहू चौपाटी, मालाडमधील मढ, आक्सा आणि मार्वे हे दक्षिण मुंबई तसेच उपनगरातील महत्त्वाचे समुद्र किनारे आज गणरायाच्या विसर्जन सोहळ्याने फुलून जातील. तर काही सार्वजनिक तलावांमध्येही घरगुती छोट्या आकारातील गणपतीचे विसर्जन केले जाणार आहे.

- Advertisement -

ऋषीपंचमीच्या मुहुर्तावर

गणेशोत्सवाच्या काळात अकरा दिवस गणरायाचे आवडते फुल जास्वंद, दुर्वा, आवडतं गोड पदार्थ मोदक, चणे, शेंगदाणे, फुटाणे यांची रेलचेल मंडळं आणि गणपती विराजमान असलेल्यांच्या घरोघरी पाहायला मिळते. विविध पदार्थांची मेजवानी आणि नैवेद्य बाप्पासाठी बनवले जातात. आज ऋषीपंचमीच्या मुहुर्तावर बाप्पाच्या नैवेद्यामध्ये ऋषीची भाजी आवर्जून असते. कालची रात्र आणि आजचा अर्धा दिवस अशा प्रकारे दीड दिवसाच्या गणपतीचे दुपाली तीननंतर विसर्जन केले जाईल. आगमनासारखेच विसर्जन मिरवणूकीतही ढोलताशाचा गरज केला जातो. ‘पुढच्या वर्षी लवकर या…’ या गजरात बाप्पाल निरोप दिला जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -