घरताज्या घडामोडीवर्षाच्या पहिल्याच दिवशी मोदी सहा राज्यांमध्ये 'लाईट हाउस प्रोजेक्ट'ची पायाभरणी करणार

वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोदी सहा राज्यांमध्ये ‘लाईट हाउस प्रोजेक्ट’ची पायाभरणी करणार

Subscribe

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ वाजता ६ राज्यांमध्ये ६ ‘लाईट हाउस प्रोजेक्ट’ची पायाभरणी करणार आहेत. दरम्यान जागतिक गृहनिर्माण बांधकाम तंत्रज्ञान स्पर्धा अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्रिपुरा, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये लाईट हाउस प्रोजेक्टची पायाभरणी केली जाणार आहे. तसेच मोदींचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यादरम्यान आशा इंडिया म्हणजेच ‘अफोर्डेबल सस्टेनेबल हाऊसिंग एक्सेलरेटर’च्या विजेत्यांची नाव जाहीर केली जाणार आहेत. याशिवाय पंतप्रधान गृहनिर्माण योजना (शहरी)च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी वार्षिक पुरस्काराचे वितरण देखील करणार आहेत.

लाईट हाउस प्रोजेक्ट केंद्रीय शहरी मंत्रायलाची महत्त्वकांक्षी योजना आहे. याअंतर्गत लोकांच्या राहण्याची सोय केली जाईल. गुरुवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंबंधी ट्विट करून माहिती दिली.

- Advertisement -

ते म्हणाले की, २०२१ या नवं वर्षाच्या पहिल्याच दिवशी मी भारतच्या शहरी लँडस्केप बदलण्याच्या उद्देश असलेल्या एका कार्यक्रमात उपस्थित राहीन. लाईट हाऊस प्रोजेक्टची पायाभरणी करेल. याशिवाय पीएमएवाय आणि आशा इंडिया पुरस्कार देईल. देशात ज्या सहा राज्यांमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईट हाउस प्रोजेक्टची पायाभरणी करणार आहेत. तिथे जीएचटीसी इंडिया इनिशिटीव्ह अंतर्गत घरे निर्माण केली जातील.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोना लसीची प्रतिक्षा संपणार? ‘या’ तीन कंपन्या लशीच्या शर्यतीत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -