घरदेश-विदेशआशिया खंडातील सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

आशिया खंडातील सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमार्फत केले उद्घाटन

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमार्फत मध्य प्रदेशातील रीवामध्ये स्थापन करण्यात आलेल्या ७५० मेगाव्हॅटचा सौरऊर्जा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला समर्पित केला. या कार्यक्रमासाठी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्रीही उपस्थित होते. हा प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प असून त्याची क्षमता ७५० मेगाव्हॅट आहे.

दिल्ली मेट्रोलाही वीज मिळणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील रीवा येथील सौरऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी देशाला संबोधित केले. त्यावेळी मोदी म्हणाले की, रीवाने आज इतिहास रचला आहे. आम्ही आकाशातून टिपलेल्या या प्लांटचा जेव्हा व्हिडिओ पाहतो, त्यावेळी असे वाटते, हजारो सोलार पॅनल शेतातील पिंकाप्रमाणे डोलत आहेत. रीवाचा सौरऊर्जा प्रकल्प या संपूर्ण क्षेत्राला ऊर्जेचे केंद्र बनणार असल्यामुळे मध्यप्रदेशातील लोकांना लाभ मिळणार असून दिल्ली मेट्रोलाही वीज मिळणार आहे.

- Advertisement -

मध्यम वर्गीयांसह आदिवासी लोकांना फायदा

‘आता रीवामधील नागरिक गर्वाने सांगितील की, दिल्लीतील मेट्रो आमचा रीवा चालवत आहे. याचा फायदा मध्यप्रदेशातील गरीब, मध्यम वर्गीय, शेतकरी आणि आदिवासी लोकांना होणार असल्याचेही पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे. त्याचबरोबर आई नर्मदेमुळे आणि पांढऱ्या वाघांमुळे रीवाची ओळख आहे. आता आशिया खंडातील सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाशी रीवाचे नाव जोडले जाणार आहे. रीवाचा हा सोलार प्लांट या संपूर्ण क्षेत्राला या दशकातील सर्वात मोठे ऊर्जेचे केंद्र बनवण्यासाठी मदत करणार आहे. या प्रकल्पामुळे मध्यप्रदेशमधील उद्योगधद्यांसोबतच दिल्लीतील मेट्रोलाही फायदा होणार आहे.

आशियातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प

मध्यप्रदेशातील रीवामध्ये आशियातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. हा प्रकल्प रीवा जिल्ह्यातील मुख्यालयातून २५ किलोमीटर दूर गुढमध्ये १५९० एकरमध्ये आहेत. हा प्रकल्प रीवा अल्ट्रा मेगा सोलार लिमिटेड, एमपी ऊर्जा विकास लिमिटेड आणि भारताचे सौरऊर्जा निगम यांचा एक संयुक्त उपक्रम आहे.


खवय्यांचा काही नेम नाही! इथला ‘मास्क पराठा’ आहे फुल्ल डिमांडमध्ये!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -