घरदेश-विदेशबंगालनंतर ओडिशाला केंद्राची मदत, ५०० कोटी देण्याची पंतप्रधानांची घोषणा

बंगालनंतर ओडिशाला केंद्राची मदत, ५०० कोटी देण्याची पंतप्रधानांची घोषणा

Subscribe

ओडिशाला अम्फान चक्रिवादळाचा तडाखा बसला आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओडिशा राज्याला ५०० कोटी रुपयांचं मदत पॅकेज जाहीर केलं.

अम्फान चक्रिवादळाचा तडाखा पश्चिम बंगाल आणि ओडिशाला बसला आहे. बंगालनंतर ओडिशामध्ये झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओडिशा राज्याला ५०० कोटी रुपयांचं मदत पॅकेज जाहीर केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी बंगालनंतर ओडिशामधील नुकसानीचा आढावा घेऊन त्यानंतर बैठक घेतली. राज्यात झालेल्या नुकसानीनंतर केंद्राला तातडीने मदत करण्यासाठी सर्वतोपरी मदत देण्यास सांगितलं. तसेच राज्याला ५०० कोटींची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली.

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की कोविड-१९ बरोबर प्रत्येकजण संघर्ष करीत आहे. या कठीण काळात भारताच्या काही राज्यांना अम्फान चक्रीवादळाचा सामना करावा लागला. हे अत्यंत चिंताजनक आहे. ओडिशामध्ये स्थलांतरामुळे अनेकांचे प्राण वाचले. मी ओडिशाच्या जनतेचे आणि राज्य सरकारचे अभिनंदन करतो.

- Advertisement -

हेही वाचा – आर्थिक पॅकेज हा देशासोबत क्रूर विनोद – सोनिया गांधी


- Advertisement -

ममता बॅनर्जी नाराज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अम्फानच्या चक्रीवादळाने नुकसान झालेल्या पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांचा हवाई दौरा केला. पाहणी केल्यानंतर त्यांनी एक हजार कोटी रुपयांचं मदत पॅकेज जाहीर केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या घोषणेने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्का बसला आहे. त्यांनी केंद्राच्या या मदतीवर नाराजी व्यक्त केली आहे. तोटा एक लाख कोटींचा आणि पॅकेज केवळ एक हजार कोटी असं म्हणत केंद्र सरकारच्या मदतीबद्दल राग व्यक्त केला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -