महाशिवरात्री निमित्त राजकीय क्षेत्रातील अनेक नामवंतांनी दिल्या शुभेच्छा!

राजकीय क्षेत्रातील अनेक नामवंतांनी महाशिवरात्री निमित्त भारतीयांना शुभेच्छा संदेश दिले आहेत.

Mumbai
Crowd at Shiva temple on Mahashivratri
महाशिवरात्रीला शिवमंंदिरात भाविकांची तुफान गर्दी

आज शिवरात्रीचा सर्वत्र उत्साह दिसत आहे. सकाळपासूनच देशभरातील शिवमंदिरात भाविक जमले आहेत. काहीजण सोशल मीडियावरही महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून देशवासियांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक नामवंतांनी महाशिवरात्रीचे शुभ संदेश दिले आहेत. राष्ट्रपति रामनाथ कोविन्द यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ”महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर सर्व देशवासियांना अभिनंदन आणि शुभेच्छा. भगवान शिव यांच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येवो, अशी माझी इच्छा आहे”.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “आपणा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. बाबा भोलेनाथ यांच्या आशीर्वादाने सर्व देशवासीयांच्या जीवनात आनंद, शांती, समृध्दी आणि सौभाग्य येवो. ओम नम: शिवाय!” 

गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. भारताच्या निरंतर समृद्धीसाठी मी महादेवाला प्रार्थना करतो. हर हर महादेव. ”

तसेच कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही महाशिवरात्रीनिमित्त भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांनी ट्वीट केले आहे की, “महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा.” या ट्विटमध्ये त्यांनी कैलास पर्वताचे छायाचित्रही जोडले आहे.