उज्जवला योजनेंतर्गत महिलांना ३ महिन्यांपर्यंत मिळणार मोफत LPG गॅस

पंतप्रधान उज्जवला योजनेंतर्गत ३ महिन्यांपर्यंत एलपीजी घरगुती गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे.

New Delhi
pradhan mantri ujjwala yojana now free 3 months lpg gas cylinder 8 crore women
महिलांना ३ महिन्यांपर्यंत मिळणार मोफत LPG गॅस

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडॉन करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान उज्जवला योजनेंतर्गत ३ महिन्यांपर्यंत एलपीजी घरगुती गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे. तब्बल ८ कोटी महिलांना याचा फायदा होणार आहे. उज्जवला योजनेंतर्गत ८ कोटी बीपीएल कुटुंबीयांना तीन महिन्यांपर्यंत मोफत सिलिंडर मिळणार आहे. उज्जवला योजनेंतर्गत मोफत गॅस कनेक्शन दिले जात असून या योजनेत बदल करण्यात आला आहे. १ ऑगस्ट २०१९ पर्यंत जोडलेल्या ग्राहकांना आता याचा फायदा घेता येणार आह. तेल कंपन्यांनी जुलै २०२० पर्यंत ईएमआय पुनर्प्राप्ती योजना पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

असा करा अर्ज

पंतप्रधान उज्जवला योजनेच्या वेबसाईटवरुन PMUY चा अर्ज डाऊनलोड करा. तसेच नजीकच्या एलपीजी केंद्राकडून देखील अर्ज करु शकता. तसेच अंतर्गत गॅस कनेक्शन मिळविण्यासाठी बीपीएल कुटुंबातील कोणतीही महिला अर्ज करु शकते. याकरता तुम्हाला केवायसी फॉर्म भरावा लागणार आहे. तसेच हा फॉर्म नजीकच्या एलपीजी सेंटरमध्ये जमा करावा लागेल. PMUY मध्ये अर्जासाठी २ पानांचा फॉर्म आवश्यक कागदपत्रे, नाव, पत्ता, जन धन बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक आवश्यक असणार आहे. त्याचप्रमाणे अर्ज करताना आपल्याला १४.२ किलो सिलिंडर घ्यायचा आहे की ५ किलो घ्यायचा आहे. हे सांगावे लागणार आहे.


हेही वाचा – व्यायामाअभावी गरोदर मातांना सिझरची भीती


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here