Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी देशातील तरुणांनी आत्मनिर्भर व्हावं - पंतप्रधान

देशातील तरुणांनी आत्मनिर्भर व्हावं – पंतप्रधान

'देशातील तरुणांनी आत्मनिर्भर व्हावं यामुळे भविष्यातील वैज्ञानिक पिढी घडवण्यास मदत होईल', असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

Related Story

- Advertisement -

‘भारत स्वत:ची नेव्हिगेशन प्रणाली असलेला देश आहे. तसेच भारतीय उत्पादनांना संपूर्ण जगात मागणीही आहे. परंतु, ही मागणी जगभरात वाढली पाहिजे. त्याचप्रमाणे देशातील युवकांनी आत्मनिर्भर बनण्याचा संकल्प करावा. २०२० मध्ये देश स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण करत आहे. तर २०४७ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होणार आहे. त्यामुळे आपल्याला आत्मनिर्भर भारतासाठीचे संकल्प लक्षात घेऊन पुढे जावं लागणार आहे. त्यासाठी नवीन उद्दिष्ट, नवीन परिमाणं, नवी उंची गाठण्याच्या दिशेने पावलं टाकावी लागणार आहेत. सीएसआयआरच्या शास्त्रज्ञांनी देशातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांशी संवाद करावा. कोरोना काळातील आपले अनुभव आणि नव्या शोधाबद्दलची माहिती नव्या पिढीला सांगावी. त्यामुळे भविष्यातील वैज्ञानिक पिढी घडवण्यास मदत होईल’, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय हवामान परिषदेच्या उद्घाटन समारंभात केले.

नवीन वर्ष मोठं यश घेऊन आलं

‘२०२१ हे वर्ष मोठं यश घेऊन आलं आहे. कारण या नवीन वर्षात भारतात सीरम आणि ऑक्सफर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोवॅक्सिन या दोन्ही लसींना आपत्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे ही लस मेड इन इंडियाची असून हे भारताचे मोठे यश असणार आहे’, असे ही ते पुढे म्हणाले.

- Advertisement -

तसेच ‘भारतात दोन लसींना परवानगी देण्यात आली असून, देशात लवकरच कोरोना लसीकरणाला सुरूवात होत आहे. देशातील सेवा गुणवत्तापूर्ण असायला हव्यात. मग ते क्षेत्र सरकारी असो वा खासगी. वस्तू दर्जेदार हव्यात. आपली गुणवत्ता परिमाण हे निश्चित करणार आहे की, भारतीय बनावटीच्या वस्तूंची जगात किती मागणी वाढली आहे’, असं मोदी म्हणाले.


हेही वाचा – फेब्रुवारी-मार्चपर्यंत सीरमची कोविशिल्ड लस बाजारात येईल; अदर पुनावाला यांचा दावा


- Advertisement -