घरदेश-विदेशकेरळमध्ये साथीचे आजार जोरावर

केरळमध्ये साथीचे आजार जोरावर

Subscribe

आतापर्यंत केरळमध्ये ११ हजार गावं उद्धवस्त झाली आहेत. केरळ राज्यात पूरपरिस्थिती मुळे मोठी जिवित हानी झाली आहे. सध्या पाऊस थांबला आहे मात्र आता जास्त प्रमाणात तापाचे रूग्ण केरळमध्ये दिसत आहेत.

सुरुवातीला अतिवृष्टी आणि आता पुराचं ओसरतं पाणी अशी परिस्थिती सध्या केरळची झाली आहे. जागोजागी पाणी साचल्याने आणि सतत पाण्यात राहिल्याने केरळवासीयांना सध्या साथीचे आजार जडले आहेत. त्यामुळे सध्या केरळचे डॉक्टर्स आणि महाराष्ट्रातील डॉक्टर्स मिळून या केरळवासीयांना उपचारांसोबत धीर देण्याचं काम करत आहेत. घर, कपडे, अख्खा संसार पाण्याखाली गेल्याने केरळवासिय मानसिक तणावाखाली आयुष्य जगत आहेत. तणाव आणि दु:ख अशी परिस्थिती सध्या केरळवासीयांची आहे. केरळात साथीचे आजार पसरु नयेत यासाठी डॉक्टर्स सर्वोतपरी प्रयत्न करत आहेत.

महाराष्ट्रातील डॉक्टर्स केरळमध्ये मदतीला

महाराष्ट्रातील डॉक्टर्स केरळच्या त्रिशूर, एर्नाकुलम आणि पथनमथित्ता या तीन ठिकाणी टीम पाठवल्या गेल्या आहेत. जिथे वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना राहण्यासाठी कॅम्प्स बांधण्यात आले आहेत. त्याच कॅम्पमध्ये हे डॉक्टर्स लोकांवर उपचार करत आहेत. सकाळी ११ वाजता या तिन्ही टीम आपापल्या ठिकाणी पोहोचून तिथल्या लोकांना आरोग्यसेवा देत आहेत. त्रिशूरमध्ये आतापर्यंत ५०० पेक्षा अधिक रूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.

- Advertisement -

सर्वात जास्त तापाचे रुग्ण

तिन्ही शहरांमध्ये पाणी साठल्याने पूर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना ताप, त्वचेचे विकार असे आजार उद्भवत आहेत. आतापर्यंत पठणमिथ्थतामध्ये बांधलेल्या कॅम्प्समध्ये जवळपास ४०० पेक्षा अधिक लोकांना तपासण्यात आलं आहे. ज्यात सर्वात जास्त तापाचे रुग्ण आढळले आहेत. शिवाय, पावसादरम्यान काही लोकांच्या शरीरावर जखमा देखील झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचं ड्रेसिंग करण्यात आलं असल्याची माहिती तिथे काम करणाऱ्या जे.जे रुग्णालयातील डॉ. सारंग दोनारकर यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली आहे. तापाचे रुग्ण ७० ते ८० टक्के आहेत. रुग्णांची संख्या वाढतेय. वयस्कर लोकांना हायपरटेन्शन, डायबिटीज, ताप, स्किन इंन्फेक्शन,ह्रदयाचे विकार असे आजार असल्याचं आढळलं आहे. त्यांना पॅरॉसॉटिमॉल तसंच इन्सुलिन देण्यात आलं आहे.
तर, त्रिशूरामध्ये एकूण १६ कॅम्प्स पैकी १० कॅम्प्समधील लोकांना ३० डॉक्टरांच्या टीमने तपासलं आहे. ज्यामध्ये तापाचे आणि त्वचेचे विकार असलेले रुग्ण जास्त आढळले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. रुग्णांना डॉक्सिसायक्लिन, पॅरासीटामॉल अशी औषधं दिली जात आहेत. जवळपास आतापर्यंत या परिसरात असलेल्या शिबीरांमध्ये ओपीडीतील ४०० हून अधिक नागरिकांची तपासणी केली गेली आहे.

doctors at kerala
रूग्णांना तपासत असताना डॉक्टर्स

केरळात उपचार करताना डॉक्टरांना ‘ही’ आहेत आव्हाने

या पुराच्या पाण्यामुळे घरात फक्त आणि फक्त चिखल झाला आहे. पाण्याचा उपसा कसा करायचा हा प्रश्न इथल्या नागरिकांपुढे आहे. त्यासोबत या सर्वांचं पुनर्वसन कसं होणार ? हा देखील गंभीर प्रश्न आहे. काहीच सुविधा सध्या या परिसरात उपलब्ध नाही.

- Advertisement -

भाषेमुळे अडथळा
केरळच्या नागरिकांवर उपचार करताना डॉक्टरांना भाषेमुळे मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे त्या लोकांना कशापद्धतीने गोळ्या घ्यायच्या आहेत किंवा कशापद्धतीने उपचार करायचे आहेत हे सांगण्यासाठी डॉक्टरांना ट्रान्सलेटरची गरज पडते आहे.

औषधांची उपलब्धता
महाराष्ट्रातील डॉक्टर्स चार दिवस पुरतील एवढी औषधं केरळमध्ये घेऊन दाखल झाले आहेत. पण, तरीही ही औषधं कमी पडतील अशी भीती डॉक्टर्स व्यक्त करत आहेत. सुविधाच नसल्याने आय.व्ही फ्ल्युड्स लावण्यासाठी कठीण जात आहे. रुग्णालय बंद असल्याकारणाने रुग्णांना दाखल करुन घेणंही कठीण आहे. २६ लाख घरांना वीजपुरवठा होत नाही.

doctors at kerala
डॉक्टरांची केरळमध्ये मदत

काय आहे सद्यपरिस्थिती?

आतापर्यंत केरळमध्ये ११ हजार गावं उद्धवस्त झाली आहेत. ७ लाखांहून अधिक लोकं बेघर झाले आहेत. त्यात ४५२ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मोठ्या प्रमाणात जीवितहानी, वित्तहानी झालेली आहे. तसंच, सोमवारी दिवसभरात ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. २० हजार कोटींचं नुकसान झालं आहे. साडे सात लाख लोक आश्रित झाले आहेत. तरीही, नव्याने आयुष्य जगण्यासाठी पुन्हा एकदा केरळवासिय सज्ज होताना दिसून येत आहेत.

डबेवाल्यांची रोटी बँक केरळच्या मदतीला

केरळ राज्यात पूरपरिस्थिती मुळे मोठी जिवित हानी झाली आहे. आर्थिक नुकसान मोठे झाले आहे. या संकटामध्ये केरळवासीयांच्या मदतीला डबेवालेही आले आहेत. पेपर ॲन्ड पार्सल आणि डबेवाल्यांची रोटी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने केरळ मधील पूरग्रस्त लोकांना एक हजार किलो तांदुळ आणि प्रथोमोपचाराच्या गोळ्या पाठवण्यात आल्या आहेत. कुरिअरच्या माध्यमातून ही मदत मंगळवारी लोअर परेल येथून केरळला पाठवली गेली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -