घरताज्या घडामोडीRISAT 2BR1 सॅटेलाईटचं भारतानं केलं यशस्वी प्रक्षेपण!

RISAT 2BR1 सॅटेलाईटचं भारतानं केलं यशस्वी प्रक्षेपण!

Subscribe

श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून RISAT 2BR1 या उपग्रहाचं पीएसएलव्ही प्रक्षेपकाच्या मदतीने यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं.

चांद्रयान २ मोहीम अपयशी ठरल्यानंतर भारतीय शास्त्रज्ञांना रडताना अवघ्या जगानं पाहिलं. मात्र, आज त्याच भारतीय अवकाश शास्त्रज्ञांनी पीएसएलव्हीच्या पन्नासाव्या मोहिमेचं यशस्वी प्रक्षेपण करून दाखवलं आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने RISAT 2BR1 या सॅटेलाईटचं श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरून दुपारच्या सुमारास यशस्वी प्रक्षेपण केलं. पीएसएलव्हीमधून प्रक्षेपित होणारा हा पन्नासावा सॅटेलाईट आहे. विविध भूभागांची छायाचित्र काढण्यासाठी प्रामुख्याने या सॅटेलाईटचा वापर केला जाणार आहे. रडार इमेजिंग अर्थ ऑब्जर्व्हेशन श्रेणीतला हा सॅटेलाईट आहे. दुपारी ३च्या सुमारास पीएसएलव्ही प्रक्षेपकातून या सॅटेलाईटचं प्रक्षेपण करण्यात आलं. या सॅटेलाईटचं वजन ६२८ किलो इतकं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -