घरदेश-विदेशSBIची नवी झेप!; लडाखमध्ये १० हजार फूट उंचीवर उघडली नवी शाखा

SBIची नवी झेप!; लडाखमध्ये १० हजार फूट उंचीवर उघडली नवी शाखा

Subscribe

लडाखच्या दिस्कित गावात आपली नवी शाखा उघडण्याचा SBI चा विक्रम

देशभरात सर्वात जास्त शाखा असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने १४ सप्टेंबर, शनिवारी लडाखच्या दिस्कित गावात आपली नवी शाखा उघडण्याचा विक्रम केला आहे. हा विक्रम होण्यामागे एक कारण असे आहे की, हे गावं समुद्रसपाटीपासून १० हजार ३१० फूट उंचीवर आहे. या नव्या शाखेचं उद्घाटन स्टेट बँक ऑफ इंडियाचे संचालक रजनीश कुमार यांनी नुब्रा घाटीमध्ये या शाखेचे उद्घाटन केले.

- Advertisement -

या नव्याशाखेसह आणखी दोन दुर्गम भागांमध्ये शाखा उघडण्यासाठी प्रस्ताव ठेवलेला आहे. लडाखमधील ही नवी १४वी शाखा आहे. लडाख केंद्र शासित प्रदेश केल्यानंतर आता त्याठिकाणी सरकारी संस्था देखील पोहोचत आहे. मंत्रिमंडळाबरोबरच आता विविध संस्था, प्रशासनांनी विस्तार करण्यास सुरूवात केली आहे. अशातच देशातील सर्वात उंच असणाऱ्या ठिकाणी बँकेची शाखा उघडण्याचा मान स्टेट बँक ऑफ इंडियाने मिळवला आहे.


हेही वाचा – रानू मंडल पुर्वी ‘ही’ होती स्टेशनवर गाणारी पहिली प्लेबॅक सिंगर

केंद्र सरकारने ३७० कलम रद्द करत लडाखला वेगळे केल्याने देशाच्या सरकारी बँकांना विकासासाठी महत्त्वाची भूमिका निभावण्याचे स्वातंत्र्य मिळाल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया सरकारी योजनांकरिता पुढाकार घेणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -