घरताज्या घडामोडीएअर इंडिया, LIC च्या खासगीकरणाविरोधात शिवसेना आक्रमक; संजय राऊतांची टीका

एअर इंडिया, LIC च्या खासगीकरणाविरोधात शिवसेना आक्रमक; संजय राऊतांची टीका

Subscribe

केंद्र सरकार काही सराकरी कंपन्यामध्ये निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून त्यांचे खासगीकरण करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तशी पाऊले देखील उचलण्यात आली आहेत. या प्रश्नावर शिवसेना आक्रमक झाली असून शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी आवाज उचलला आहे. जेएनपीटी, एअर इंडिया, एलआयसी सारख्या कंपन्यांचे खासगीकरण करु नका, असे त्यांनी ठणकावून सांगितले. खासगीकरणामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागतील, असा इशाराही राऊत यांनी यावेळी दिला.

राऊत म्हणाले की, देशाची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. आपला GDP रसातळाला गेला आहे. तर आरबीआय बँक सुद्धा डबघाईला आली की काय? असे चित्र दिसते. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने एअर इंडिया, एलआयसी आणि इतर सरकारी कंपन्या बाजारात विकायला काढल्या आहेत. आता तर या सेलमध्ये सरकारने जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) या कंपनीला देखील सामील केले आहे.

- Advertisement -
हे वाचा – मोदी सरकार या ६ सरकारी कंपन्यांना टाळं ठोकणार

जेएनपीटीचे खासगीकरण करण्याबाबत केंद्र सरकार विचार करत आहे. मात्र जेएनपीटी हे जगातील सर्वात मोठे बंदर आहे. या बंदराच्या माध्यमातून भारत सरकारला ३० टक्के नफा मिळतो. सरकारला महसूल मिळवून देणारे एवढे महत्त्वाचे बंदर जर खासगी हातात दिले तर राष्ट्रीय संपत्तीचे मोठे नुकसान होणार आहे, असेही राऊत यांनी यावेळी सांगितले.

माझी आई, भाऊ कोरोना पॉझिटिव्ह

खासगीकरणाच्या मुद्द्यासोबतच राऊत यांनी महाराष्ट्रातील कोरोना उपाययोजनांचा मुद्दा उचलला. “भाजप खासदार महाराष्ट्रावर टीका करत आहेत. पण मी सांगू इच्छितो की, या महामारीमुळे माझी आई, भाऊ हे कोरोना पॉझिटिव्ह झाले असून ते आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. महाराष्ट्रात अनेक लोक बरे झाले आहेत. धारावी, वरळी सारख्या ठिकाणी कोरोनाला अटकाव करण्यात आम्हाला यश मिळाले आहे. WHO ने देखील मुंबई महानगरपालिकेचे कौतुक केले आहे. संकट असूनही महाराष्ट्र चांगले काम करत आहे. मात्र राज्यातीलच काही खासदार महाराष्ट्रावर टीका करतायत, हे योग्य नाही.”

- Advertisement -

'भाभीजी के पापड' खाऊन कोरोनाग्रस्त बरे होतायत का? संजय राऊत | Sanjay Raut Slams BJP on Corona issue

भाजपकडून संसदेत महाराष्ट्रावर सतत आरोप केला जात आहे की, कोरोनावर उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र अपयशी ठरला आहे. महाराष्ट्राने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसारच आम्ही उपाययोजना करत असल्याचे संजय राऊत यांनी राज्यसभेत सांगितले. तसेच काल राज्यात एका दिवसात ३० हजार लोक कोरोनातून बरे झाले. ते काय भाभीजी के पापड खाऊन बरे झालेत काय? असा प्रतिप्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Wednesday, September 16, 2020

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -