लॅाकडाऊनमध्येच न्यूटनने लावला होता गुरुत्वाकर्षणाचा शोध!

अशाच एका लॉकडाऊनच्या काळातच आयझॅक न्यूटन यांना गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला होता हे तुम्हाला माहिती आहे का?

London
Isaac Newton
आयझॅक न्यूटन

सध्या करोनाच्या साथीमुळे जगभरातील लोक लॅाकडाऊनच्या स्थितीत आहेत. त्यामुळे घरी बसून काय करायचे? असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. पण, हा जो मोकळा वेळ तुम्हाला मिळाला आहे, तो तुम्ही सत्कारणी लावू शकता. फक्त सकारात्मक दृष्टीकोनाची गरज आहे. महान शास्रज्ञ सर आयझॅक न्यूटन हे देखील प्लेगच्या साथीत लॅाकडाऊन स्थितीत होते. पण त्यांच्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे त्यांनी त्या वेळेचा सदुपयोग केला आणि संपूर्ण जगाला गुरुत्वाकर्षण बलाचा शोध लावून दिला.

प्लेगमुळे न्यूटन यांचं वर्क फ्रॉम होम!

न्यूटन यांनी त्यांची बॅचलर पदवी ट्रिनीटी कॅालेज, केम्ब्रिज येथून १६६५ साली घेतली. त्यानंतरही ते पुढील शिक्षण घेत होते. मात्र, त्याचवेळी लंडनमध्ये प्लेगची साथ सुरू झाली. त्यामुळे इतरांप्रमाणे न्यूटन यांनाही लॅाकडाऊन स्थितीत जावे लागले. त्यामुळे न्यूटन यांनी घरातून काम करणे सुरू केले. कॅालेजमध्ये शिकताना न्यूटन यांचा वेळ पुस्तकी शिक्षणात जात होता. मात्र लॅाकडाऊमध्ये त्यांनी घरातून काम सुरू केल्यावर त्यांच्या प्रतिभेला खऱ्या अर्थाने बहार आली.

…तर सफरचंद खाली पडलंच नसतं!

याच काळात न्यूटन गार्डनमध्ये बसले असताना त्यांच्या अंगावर सफरचंद पडले आणि ते खाली का आले, वर का गेले नाही? असा विचार त्यांच्या मनात सुरू झाला. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. लॅाकडाऊनचा तो काळ नसता तर न्यूटन कॅालेजमध्ये गेले असते. सफरचंद खाली का आले? याचा विचार करायला त्यांना वेळच मिळाला नसता. ते पुन्हा पुस्तकी ज्ञानात अडकून पडले असते आणि गुरुत्वाकर्षणाचा शोधही कदाचित लागला नसता. लॅाकडाऊनचा काळ संपून न्यूटन जेव्हा पुन्हा कॅालेजमध्ये गेले तेव्हा ते विद्यार्थी राहिले नव्हते तर प्रोफेसर झाले होते. तर मित्रांनो, आजच्या लॅाकडाऊनमुळे कंटाळून जाऊ नका, संधीचा सदुपयोग करा, कदाचित आपल्यात कोणीतरी न्यूटन तयार होईल..नाही का?

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here