घरदेश-विदेश६६ वर्षानंतर श्रीधर चिल्लाल कापणार नखं

६६ वर्षानंतर श्रीधर चिल्लाल कापणार नखं

Subscribe

गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये सर्वांत लांब नखामुळे ज्यांच्या नावाची नोंद झाली आहे ते श्रीधर चिल्लाल यांनी नखं कापण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या ६६ वर्षापासून त्यांनी नखं कापली नाहीत. आता वयाच्या ८२ व्या वर्षी अखेर त्यांनी नखं कापण्याचा निर्णय घेतला आहे.

जगातील सर्वात लांब नखांचा रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवणारे श्रीधर चिल्लाल अखेर नखं कापण्यासाठी तयार झाले आहेत. गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये त्यांच्या नावाची नोंद झाली आहे. श्रीधर चिल्लाल यांनी १९५२ सालापासून नखं कापली नाहीत. त्यांची नखं सध्या जगातील सर्वांत लांब नखं आहेत. मात्र वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी आपले नखं कापण्याचा निर्णय घेतला आहे.

१९५२ पासून कापली नाही नखं

गेल्या ६६ वर्षामध्ये जे केलं नाही ते आता श्रीधर चिल्लाल करणार आहेत. १९५२ पासून त्यांनी त्यांच्या डाव्या हाताची नखं कापली नाहीत. ज्या नखांमुळे २०१६ मध्ये गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये त्यांच्या नावाची नोंद झाली आहे. त्या नखांना आता ते कापणार आहेत. त्यांच्या अंगठ्याच्या नखाची लांबी १९७.८ सेंटीमीटर आहे तर, एका हाताच्या सगळ्या नखाची लांबी ९०९.६ सेंटीमीटर ऐवढी आहे.

- Advertisement -

श्रीधर यांचे आजही नखांवर प्रेम

श्रीधर चिल्लाल यांची नखं टाईम्स स्क्वायरमधील ‘बिलिव्ह इट ऑर नॉट म्युजियम’ मध्ये कापली जाणार आहेत. जिथे ही नखं कापण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीधर यांना आजही आपल्या या नखांवर खूप प्रेम आहे. त्यामुळे त्यांनी या नखांना म्युजियममध्ये संग्रहित करण्याची विनंती केली आहे. श्रीधनर चिल्लाल हे पुण्याचे रहिवासी आहेत.

उद्या अमेरिकेत कापली जाणार नखं

श्रीधर चिल्लाल यांची नखं कापण्याच्या या कार्यक्रमासाठी खास करुन त्यांना भारतातून अमेरिकेला बोलावण्यात आले आहे. हा कार्यक्रम कायम लक्षात रहावा यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे. हा कार्यक्रम अमेरिकेमध्ये बुधवारी होणार आहे. जो भारतीय वेळेनुसार गुरुवारी होणार आहे. या कार्यक्रमानंतर श्रीधर यांची नखं म्युजियममध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -