घरदेश-विदेशअभाविपचे अध्यक्ष ते अर्थमंत्री; जेटलींचा प्रेरणादायी प्रवास!

अभाविपचे अध्यक्ष ते अर्थमंत्री; जेटलींचा प्रेरणादायी प्रवास!

Subscribe

अरुण जेटली विद्यार्थी दशेत असताना त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. भारतातील आणीबाणी परिस्थितीत त्यांनी महत्त्वपूर्ण कामे केली. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांच्या सरकारने त्यांना १९ महिने नजरकैद ठेवले.

भारताचे माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे वयाच्या ६७व्या वर्षी निधन झाले. जेटलींच्या जाण्याने भाजप पक्षासोबतच देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे. देशाचा एक विद्वान आणि चाणाक्ष बुद्धिमत्ता असलेला कर्तृत्वान नेता हरपला. त्यामुळे देशात त्यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अरुण जेटली विद्यार्थी दशेपासूनच राजकारणात सक्रिय आहेत. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात जेटली दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते. त्यामुळे त्यांच्या विषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच्या तरुण पिढीला नेहमीच उत्सुकता राहिली. अर्थमंत्री म्हणून लोकसभेत अर्थसंकल्प सादर करताना जेटलींच्या बोलण्यात आणि नजरेत जो आत्मविश्वास दिसायचा तो भारतीयांना भविष्याबाबत दिलासा द्यायचा. त्यामुळेच बहुसंख्य भारतीयांनी मोदी सरकारच्या जीएसटी आणि नोटबंधी धोरणांवर विश्वास ठेवून पुन्हा एकदा मोदी सरकारला संधी दिली.

हेही वाचा – ‘त्या’ आजारामुळे जेटलींची प्रकृती वर्षभरापासून खुपच खालावली

- Advertisement -

बोफर्स घोटाळ्याचा केला तपास

अरुण जेटली यांनी सुरुवातीला सुप्रीम कोर्टाचे वकील म्हणून काम केले. १९८९ साली बोफोर्स घोटाळा समोर आल्यानंतर त्या घोटाळ्याच्या तपास समितीत जेटलींनी महत्त्वाती भूमिका बजावली. देशभरातील टॉप १० वकिलांमध्ये अरुण जेटली यांचे नाव घेतले जाते. जेटली विद्यार्थी दशेत असताना त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. भारतातील आणीबाणी परिस्थितीत त्यांनी महत्त्वपूर्ण कामे केली. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांच्या सरकारने त्यांना १९ महिने नजरकैद ठेवले. त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्यासोबत भ्रष्टाचार विरोधातील एका आंदोलनात देखील सहभाग घेतला होता. १९९० साली ते सुप्रीम कोर्टाचे वकील बनले. १९८९ साली त्यांना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्त केले गेले. १९९१ साली ते भाजपचे सक्रिय सदस्य बनले. हिंदी आणि इंग्रजी भाषांवर प्रभुत्व असल्यामुळे भाजपने त्यांना प्रवक्त पदाची सुत्रे दिली. अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात त्यांच्यावर सूचना आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर त्यांना स्वतंत्र राज्यमंत्री बनवले गेले. त्याचबरोबर २००० साली झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना कायदे व न्यायमंत्री आणि शिपिंग मंत्रीपदाची सुत्रे देण्यात आली. यावेळी देखील त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी केली. मोदी सरकारच्या कार्यकाळात त्यांनी वित्त मंत्री म्हणून अविश्वसणीय कामगिरी केली.

हेही वाचा – माजी केंद्रीय अर्थमंत्री यांचा जीवनप्रवास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -